महाराष्ट्र सामाजिक

झूडपी जमिनीवर होणार वृक्ष लागवड :-गिरीश गायकवाड़

देवळी ता. प्रतिनिधी:सागर झोरे

झूडपी जमिनीवर होणार वृक्ष लागवड :-गिरीश गायकवाड़

भविष्यात वृक्षच हे आपले प्राण वाचवू शकतो या करीता भविष्याचा विचार करूण वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे.या करिता पूलगाव सह वनक्षेत्रातील वनविभागाच्या जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात आली त्यावेळी पूलगाव सहवनक्षेत्र, गिरोली नियतक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मौजा पिंपळगाव (लूटे)येथील झूडपी जमिणीवर वृक्ष लागवड करतांना पूलगाव सहवन क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक गिरीश गायकवाड यांनी व्यक्त केले

मौजा पिंपळगाव येथे वनविभागाची झूडपी सर्वे न.२३ मध्ये उपवनसंरक्षक, वर्धा, सहाय्यक वनसंरक्षक, वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रफूल कांबळे ,उपसरपंच विजय गोडबोले ,वनरक्षक गणेश जाधव,यांची उपस्थिती होती

झूडपी सर्व नं.२३ , हेक्टर ४ मध्ये ४४४४ वृक्ष विविध देशी. ,प्रजातींचे वृक्ष लागवडीचा शूभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक सचिन गावंडे,आभार वनरक्षक कू. वैशाली खोंडे यांनी मानले यावेळी ग्रामस्थ, ग्रा. पं.सदस्य,यांची उपस्थिती होती

Copyright ©