Breaking News महाराष्ट्र

बाहुलीला आग लागताच घरातील कपड्यांनी घेतला पेट

वर्धा जिल्हा प्रतिनिधी:- पंकज तडस

बाहुलीला आग लागताच घरातील कपड्यांनी घेतला पेट

जादुटोणा असावा याची गावात दहशत

जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात घराचे कंपाऊंड मधील संडासचे खिडकीचे जाळीला बांधून असलेल्या कापडी बाहुलीच्या प्रतापाने घरात दोन ठिकाणी आग लागल्याची घटना हिंगणघाट तालुक्यातील इंझाळा (वेळा) येथे विठ्ठल हिंगे यांचे घरी घडली. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे सांगितले.

तर उपरोक्त घटना काळया जादूटोण्याचे किंवा भानामतीचे प्रकारातून घडली असल्याची कुटुंबाची धारणा झाली असून यामुळे संपुर्ण गावात दहशत पसरली आहे.

सदर प्रकरणी हिंगे कुटुंबीयांनी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस काय कारवाई करणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आज शनिवारी सकाळी प्रांगणातील संडासचे खिडकीचे जाळिला गेल्या ४-५ दिवसांपासून एक कापडी बाहुली बांधून असल्याची माहिती मिळाली. यामुळे ही बाहुली आज सकाळी तेथून काढण्यात आली, हिंगे कुटुंबीयांना जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय आला, महत्वाचे म्हणजे या बाहुलीवरती घरातील छोट्या मुलीचे नाव लिहिले होते, जादूटोणा किंवा भानामतीचे भीतीमुळे हिंगे कुटुंबीयांनी ही चेटकीण बाहुली जाळण्याचा निर्णय घेतला.

ही चेटकीण बाहुली जाळताच तिकडे घराचे छपरावर वाळत घातलेल्या कपड्यांना तसेच आंतरवस्त्रासही आग लागल्याची घटना घडली.

आग आटोक्यात येत असतांनाच इकडे पुन्हा दुसऱ्या खोलीमध्येसुद्धा आग लागली, येथील कुटुंबियांचे कपडे आगीत पुन्हा जळाले.

हा जादुटोण्याचाच प्रकार असावा, या दहशतीमुळे सदर कुटुंबीय घाबरले असून झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली.

सदर घटनेची माहिती अ. भा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकाऱ्याना देण्यात आली असता त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, हा प्रकार अंधश्रद्धेतून घडला असून यात तत्थ नसल्याचे सांगण्यात आले.

Copyright ©