Breaking News यवतमाळ

शेतातील मोटर चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक

शेतातील मोटर चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक

ग्रामीण पोलिसांची कारवाई यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत २ जुलै 2023 चीजबर्डी येथील शेतामधून सात हजार रुपये किमतीची दोन एचपी पॉवरची इलेक्ट्रिक मोटर व दोनशे फूट इलेक्ट्रिक केबल किंमत 3000 रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार सुशील हरिसिंग बलोदे ५४ वर्ष राहणार उद्योग नगर लोहारा यांनी देण्यात आली होती याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध घेतला असता त्यात फारुख खान मोमीन खान वय ३०, वर्ष राहणार कांडली परतवाडा जिल्हा अमरावती शेख समीर शेख असलम वय १८ वर्ष राहणार अशोक नगर यवतमाळ या दोघांना यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अटक केली यातील एक आरोपी फरार असल्याने त्याचा शोध सुरू असता दिनांक 14 जुलै 2023 ला अक्षय सहदेव जोंधळे व 23 वर्ष राहणार काढली परतवाडा जिल्हा अमरावती यास पोलिसांनी अटक केली व याचे जवळील २४ हजार रुपये किमतीचा मुद्दे मालं जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपी वरील 164/2023 कलम 454 380 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयासमोर दाखल करण्यात आले याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत असून ही कारवाई यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक अमोल ढोकणे,पो.उप पांडुरंग कवरासे, ज्ञानेश्वर मातकर सचिन पातकमवार,संजय राठोड.नेवारे,यांनी हि कारवाई केली असून या आरोपी कडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे यांनी सांगितले.

Copyright ©