यवतमाळ सामाजिक

कृषी आयुक्त यांनी हीवरी येथील पिकाची केली पाहणी

कृषी आयुक्त यांनी हीवरी येथील पिकाची केली पाहणी

यवतमाळ तालुक्या अंतर्गत हिवरी येथील विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग यांनी भेट देऊन शेतकरी विशेष मार्गदर्शन केले यात गौरव सोपान गुल्हाने यांच्या शेतात बीबीएफ व सोयाबीन लागवड पिकाची पाहणी केली यावेळी विभागीय कृषी संचालक अमरावती के एस मुळे तसेच डाबरे प्रकल्प संचालक आत्मा यवतमाळ यांनी हे उपस्थित होते बीबीएफ तंत्रज्ञानावर लागवडीचे महत्त्व पेरणी कशा पद्धतीने केली तर त्याचे होणारे फायदे जास्त पाऊस झाल्यास चरी मधून पाण्याचा निजरा व पाऊस पडण्यास विलंब झाल्यास जमिनीत ओलावा टिकून कसा राहतो व विकास जीवदान मिळते याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले तर दत्ताजी बापूजी गावंडे यांच्या शेतात सोयाबीन लागवडीची पाहणी करण्यात आली शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करावी लागवड करण्याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले कृषी यांत्रिकीकरण अभिमान अंतर्गत ट्रॅक्टर या अवजाराने लाभ घेतलेल्या लाभार्थी अक्षय विकास गावंडे सौ लीला संजय राऊत यांच्या ट्रॅक्टरची पाहणी करून माहिती घेतली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड केलेल्या सुरेंद्र राजेंद्र सिंग काकस यांच्या शेतातील संत्रा लागवडीची पाहणी केली व त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले सदर भेटीदरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना पिक विमा लवकरात लवकर भरणा करणे फळबाग योजनेचा लाभ घेणे ठीबक तुषार योजनेचा लाभ घेणे शेततळे करून पिकांना संरक्षण देणे त्यामुळे पाण्याची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते आणि त्यांना जीवनदान मिळते याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले सदर भेटी दरम्यान तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी मंडळ कृषी अधिकारी एस. ई. चव्हाण,कृषी पर्यवेक्षक अमोल कांबळे, मासाळ कृषी सहाय्यक सीमा अवझाडे मनीषा बालश्रॉफ,डी.के चव्हाण बी टी पाईकराव भोयर इत्यादी अधिकाऱ्यांची उपस्थितीत गावातील सरपंच उपसरपंच आणि शेतकरी दत्ता गावंडे बबन चेके, अमोल महेर संजय राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©