यवतमाळ सामाजिक

दारव्हा – नेर तालुक्यातील अनेक गावे पोलीस पाटील – विनाच ?

लाडखेड प्रतिनिधी : प्रदीप मेश्राम

दारव्हा – नेर तालुक्यातील अनेक गावे पोलीस पाटील – विनाच ?

दारव्हा – नेर तालुक्यातील अनेक गावे पोलीस पाटील – विनाच ? तर कोतवालांची प्रतिक्षा संपली – तब्बल सहा वर्षा नंतर मिळणार या गावांना कोतवाल .

दोन्ही तालुक्यातील् अनेक गावे प्रभारीच

एका पोलीस पाटलाकडे पाच सात गावचा कारभार – ?

दोन्ही तालुक्यातील नागरीक त्ररत

पोलीस पाटील ची अनेक पदे रिक्तच –

यवतमाळ जिल्ह्यांतील दारव्हा आणि नेर विभागांतील या दोन तालुक्या मधील गेली अनेक वर्षा पासुन २०18 पासुन पोलीस पाटील यांची भर्तीच नसल्याने अनेक गावा मध्ये पोलीस पाटील आणि कोतवाल यांची पदे रिक्तच आहे .

ग्रामीन भागामध्ये हक्काचा माणुस म्हनुन पोलीस पाटील यांचे कडे पाहीले जाते शासकीय अनेक प्रकारचे दाखले हे त्यांचे कडुन घेतल्या जाते . तसेच गावा मध्ये कोणताही भांडन तंटा वाद झाल्यास ठाणेदार किंवा पोलीस कर्मचारी हे प्रथमथा पोलीस पाटील आणि कोतवाला कडूनच माहीती घेतात . पोलीस पाटील हे पोलीसांन साठी महत्वाचाच दुवा मानला जातो सध्या शाळा सुरु झाल्याने अनेक दाखल्यावर पोलीस पाटलांचा सही आनि शिक्याची गरज पडते

पोलीस पाटील गावा मध्ये असला की गावामधील नागरीकांना सही शिक्याचे टेन्शनच येत नाही मनून रात्री बेरात्री जाता येते म्हनुन ग्रामीन भागातील लोक पोलीस पाटील यांना हक्काचा मानुस म्हनुन त्यांचे कडे पाहतो

अशातच गेली सहा वर्षा पासुन नेर – दारव्हा तालुक्यातील अनेक गावामध्ये प्रभारीच असल्याने आणि दोन चार गावचा प्रभार एकाच पोलीस पाटलांकडे असल्याने पाटील ही त्रस्त आणि नागरीकही त्रस्त . यात दारव्हा तालुक्यातील लाडखेड . सारखी नेर आनि दारव्हा विभागातील अनेक गावे फार मोठी असल्याने लाडखेड गावचा प्रभारी चार्ज हा चाणी कामठवाडा येथील महीला पोलीस पाटील रुंदाताई मडावी यांचे कडे लाडखेड . जांभोरा . ढवळसर . वडुळ . बाणायत . मोरगव्हान . विठठलवाडी फाटा . अशा सात गावचा कारभार हा एकट्या महीला पोलीस पाटलाकडे असल्याने पोलीस पाटील यांना जास्त वेतन नसल्याने काही गावांच्या पोलीस पाटलांना कामाला गेल्या शिवाय पर्याय च नाही . त्यामुळे बाहेर गावचा नागरीक त्या पोलीस पाटील यांचे कडे गेला की पाटील आत्ताच कामाला गेले बुवा असे म्हनुन गावातील नागरीक सांगतात . मनुन पर्यायाने दुसऱ्या ही दिवशी सकाळीच पोलीस पाटील दादांच्या सही शिक्यासाठी दादा झोपेतुन उठण्या अधीच अनेक नागरीक त्यांचे कडे जातात दारह्यातील कुंभारकिन्ही . पळशी . दारव्हा . ब्रम्हनाथ . हातनी . पेकर्डा . शेंद्री . शिंदी . चोर खोपडी . करजगाव . मानकी पिंपळगाव . तेलगव्हान . साजेगाव . खोपडी . रामगाव हरु . वघळ . हनुमान नगर वडगाव गाढवे . ढवळसर . ऊजोना . जांभोरा . बाणायत . ब्रम्ही . बोदगव्हान . गाझीपुर . बागवाडी . मोझर ईजारा. तर नेर तालुक्यातील . पाचोळ . कारखेडा . कोलुरा . झोंबाडी . नेर . टाकळी सलामी . पांढरी ब्राम्हनवाडा पंच्छीम . मांडवगड मोझर . वायी ईजारा . वटफळी . वाळकी . अजनी . उदापुर . अनंती . वायी .पारस . चिचगाव . विरगव्हान . या गावांचा समावेश असुन

कोतवालांची ही अनेक ठिकानी पदे रिक्तच आहे . परंतु आता कोतवाल पदाच्या जागेचा जाहिरनामा निघाल्याने आता या मध्ये फक्त तिन गावांना च कोतवाल मिळणार नाही या मध्ये महागाव खंड १ . I चिखली . सांगवी रेल्वे ही गावे सोडुन बाकी सर्वच गावांना आत कोतवाल मिळणार या मध्ये लाडखेड . ब्रम्ही . कुऱ्हाड बु. बोरी खुर्द . दहेली. दारव्हा खंड 2 . दारव्हा खंड १ जवळा पिंपळखुटा . तरोडा . या गावांना आत कोतवाल मिळणार तर अनेक गावचे पोलीस पाटल हे सेवानिवृत्त झाले तर काही ची सेवागत झाली असुन ग्रामीन भागातील हक्काचा दुवा समजला जाणारा पोलीस पाटील यांची रिक्त असलेली पदे शासनाने त्वरित भरून काढावी परंतु आता नेर आणि दारहा तालुक्यातील कोतवालांची प्रतिक्षा संपली असुन आता पोलीस पाटील पदांची भरती तात्काळ करावी आनी जातीने लक्ष घावे अशी नेर – दारव्हा तालुक्यातील नागरीकाकडून मागनी होत आहे .

Copyright ©