Breaking News महाराष्ट्र

न्याय न मिळाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग वरूड कार्यालयात शेतकरी करणार आत्मदहन 

वरूड तालुका प्रतिनिधी

न्याय न मिळाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग वरूड कार्यालयात शेतकरी करणार आत्मदहन 

शेवट येत्या सोमवारला आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशिल बेलेसह अनेक शेतकरी आत्मदहनाच्या पावित्र्यावर

गेल्या अनेक दिवसापासून वारंवार शेतकरी हे त्रस्त होत संबधित कार्यालयाशी पत्र व्यवहार करत आहे दोन वर्षा अगोदर बनविलेला पूल पहिल्याच पावसाळ्याच्या पाण्यामुळे दोन्ही बाजूने वाहून गेला व आज संपूर्ण पुल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना जाण्या -येण्यासाठी मार्गच शिल्लक नाही , 2021 मध्ये पुल तयार झाला तेव्हा पहिल्याच पावसाळ्यात तो वाहून गेल्याने आम्ही वारंवार मुख्यमंत्री ,पालकमंत्री, विभागीय आयुक्त , जिल्हा अधिकारी , उपविभागीय अधिकारी , खासदार , आमदार , तहसिलदार ,सार्वजनिक बांधकाम विभाग यासारख्या अनेक कार्यालयांमध्ये वारंवार पत्र दिले परंतु आजवर कोणत्याच पत्राची कुठलीही दखल घेण्यात आली नाही शेतकर्यांप्रती शासन आणि प्रशासन काठोरतेची भूमिका बजावताना दिसत आहे यामुळे हजारो शेतकऱ्याचा आणि मजुरवर्गाचा उदर्निवाह नुस्त शेतीच्याच भरावश्यावर असल्यामुळे जर शेतात पेरणी करण्यास जाण्याचा मार्गच वाहून गेला तर आता तेथील शेतकऱ्यांना मजूर वर्गाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही गेल्या दोन वर्षा पासून ऐन पीक पेरणीच्या वेळेस मंजुर व शेतकरी यांना अतिशय त्रास होत आहे जर अजुन पर्यंत शेतात पेरणीच झाली नाही तर आम्ही शेतकरी कर्जाचा बोझा आंगावर घेऊन तसे सुद्धा मरणयातनेला समोर जात आहोतच म्हणून सर्व शेतकरी व आक्रोश जनशक्ती संघटनेचे मार्फत दि. ४ जुलै रोज गुरुवार ला सार्वजनिक बांधकाम विभाग वरुड तहसील कार्यालय वरुड ,गटविकास अधिकारी वरूड यांना पत्रव्यवहार करून सांगितले होते की पाच दिवसाच्या आत पंचनामा करावा निदान तात्पुरत्या स्वरूपात शेतकऱ्यांना पेरणी करेपर्यंत व त्यांचे पीक उत्पादन निघतपर्यंत त्यांची सोय – सुविधा करून देण्यात यावी तसेच वाहून गेलेल्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी व संबधीत अधिकाऱ्यानंवर सुद्धा कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती परंतू सदर पत्राला कुठलाच न्याय न देता सार्वजनिक बांधकाम विभाग वरुड यांनी कुठलेही उत्तर न दिल्यामुळे तसेच प्रत्यक्ष शेतकरी भेटीला गेल्यावर मुद्दाम कार्यालयात उपस्थित न राहता अजून पर्यंत कोणतीच दखल घेतली नाही किंवा पंचनामा ही केला नाही म्हणून पुन्हा सोमवार दिनांक 10 जुलै व 11 जुलै ला पुन्हा पत्रव्यवहार करून आत्मदहन करणात ईशारा देणात आल्या आहे . सोमवार करण्यात येणार असे नमूद करून प्रतिलिपी जिल्हाधिकारी व मा.आमदार व तहसील कार्यालय वरूड आणि पोलीस स्टेशनला सुद्धा देण्यात आली व सोमवार दिनांक 17 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग वरूड कार्यालयात असंख्य शेतकरी व आक्रोश जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी सुशील बेले संघटना अध्यक्ष , दिलीप वंजारी उपाध्यक्ष चंद्रशेखर बागडे , श्रीरामजी कोल्हे , शिवाजी कोल्हे, दिगंबर कोल्हे ,मुरलीधर राऊत, घनश्याम कोल्हे , दिनेश लाडे हे सर्व न्याय न मिळाल्यामुळे आत्मदहन करण्याचा पवित्रा अवलंबित आहेत .

Copyright ©