यवतमाळ सामाजिक

विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे

विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे

ईतर बातम्या सह

-राजर्षी शाहू महाराज जयंती तसेच सामाजिक न्याय पर्व अंतर्गत सन-2023-24 या शैक्षणिक वर्षात 11,वी.व12,वी.विज्ञान मध्ये शिक्षण घेत असलेल्या विदयार्थीकरींता समितीव्दारे यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यात शिबीरे आयोजीत केलेली असुन शिबीरस्थळी 11 वी,व 12 विज्ञान शाखेतील प्रवेशीत विदयार्थीनी आपल्या ऑनलाईन भरलेला अर्ज त्या ठिकाणी सादर करावा.सदर शिबीराची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत असणार असून शिबिरात विदयार्थीना मोठया प्रमाणात सहभागी होऊन आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.

 

सदर शिबीरे हे तालुका निहाय पुढील प्रमाणे दि.१७ जुलै,कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय सेवादास नगर, आर्णी.दि.१३ जुलै रोजी राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,झरी-झामणी दि.१८जुलै,रोजी श्रीमती वत्सलाबाई नाईक महाविदयालय,पुसद दि.१९ जुलै,शिवरामजी मोघे कनिष्ठ महाविदयालय,केळापुर,(पांढरकवडा)दि.२० जुलै,गोपिकाबाई सितारामजी गावंडे कॉलेज,महाविदयालय,उमरखेड,दि.२५ जुलै लोकमान्य टिळक महाविदयालय,वणी,दि.२६ जुलै शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविदयालय दारव्हा,दि.२७ जुलै मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय,महागाव,तसेच दि.२८ जुलै रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,पळसवाडी कॅम्प,दरव्हा रोड यवतमाळ.येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सदर शिबीरात विदयार्थी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त्‍ करुण घेण्याकरीता पात्र राहतील सन 2023-24 मधील 11 वी‍ व 12 विज्ञान शाखेतील प्रवेशीत विदयार्थी यांनी https:// bartievalidity. Maharashtra .gov.in/ या संकेतस्थळाचा उपयोग करुन परिपुर्ण भरलेला अर्ज व मुळ कागदपत्रासह उपस्थीत रहावे,अर्जदाराचा जातीचा दाखला यवतमाळ जिल्हातील असावा व अर्जदार हा अनुसूचित जाती (SC),विमुक्त जाती भटक्या जमाती(VJNT),विशेष मागासवर्ग (SBC) व इतर मागासप्रवर्ग (OBC) याच प्रवर्गाचे अर्ज समितीकडून स्वीकारले जातील व त्याचे पडताळणी केली जाईल.अधिक महितीकरीता विदयार्थीनी आपल्या महाविदयालातील प्राचार्य यांचेशी संपर्क करावा.तसेच ज्या विदयार्थीचे अर्ज परिपुर्ण असतील त्या विदयार्थीना त्याच ठिकाणी आपले जात वैधता प्रमाणपत्र समितीकडुन देण्याचा समितीचा मानस आहे.परिपुर्ण अर्जाकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रे व पुराव्याच्या यादीकरिता https://yavatmal.gov.in/ notice-category/announcements/ या ठिकाणी भेट देण्यात यावी त्यानुसार कागदपत्रे सादर करावी,

 

वरीलप्रमाणे प्रत्येक उपविभागात एक या प्रमाणे शिबीरे आयोजीत केलेली असुन सदर शिबीरात विदयार्थीना मोठया प्रमाणात सहभागी होऊन आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.सदर शिबीराचा मुळ उददेश हा आहे की, यवतमाळ जिल्हातील एकही विदयार्थी जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासुन वंचीत राहु नये हा आहे. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यवतमाळदारे करण्यात आले आहे.

_______________________

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागामार्फत कुशल मनुष्यबळ मागणी मोहिमेचे आयोजन

यवतमाळ,दि. ११ जुलै -जिल्ह्यातील युवक युवतींना उद्योगांच्या मागणीनुसार आधारित (Demand Driven) कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी दि.१ जुलै ते ३१ जुलै २०२३ दरम्यान कौशल्याची मागणी सर्व्हेक्षणमोहिम आणि उद्योगांची कुशल मनुष्यबळ मागणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.त्या अनुषंगानेखालील दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये माहिती भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यवतमाळ या कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे.

कौशल्याची मागणी सर्वेक्षण (Skill Needs Assessment Survey)-जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,तंत्रनिकेतन,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थी,शालेय,महाविद्यालयीन शिक्षणातून गळती झालेले,शिक्षण सोडलेले,नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार तथापि,समाजातील वंचित घटकातील उमेदवारयांना त्यांना आवश्यक असलेल्या,ज्या क्षेत्रात आवड असलेल्या कौशल्याची निवडकरणे करिता खालील गुगल फॉर्म दि. ३१ जुलै,२०२३ पर्यंत जिल्ह्यातील उक्त सर्व विद्यार्थ्यांना भरणे करीता याव्दारे विनंती करण्यात येत आहे.Student Skill Need Assessment GoogleForm Link:- https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8 उद्योगांच्या मनुष्यबळांमध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी (Mapping of Skill requirement in manpower of industries)-जिल्हयातील उत्पादन व सेवा क्षेत्रातील सुक्ष्म,लघु आणि मोठ्या उद्योग क्षेत्रामध्ये कुशल,अर्धकुशल व अकुशल अशा विविध प्रकारच्या जॉबरोल अभ्यासक्रमनिहाय आवश्यक असलेल्या कौशल्याची गरज जिल्ह्यातील उद्योजक,इंडस्ट्रीज,इंडस्ट्रीज असोशिएशन,प्लेसमेंट एजन्सीज औद्योगिक आस्थापनी गरज नोंदविल्यास त्या कौशल्य अभ्यासक्रमांचा समावेश कौशल्य प्रशिक्षणामध्ये करणे शक्य होईल.या अनुषंगाने अधिक माहिताकरिता कौशल्य विकास समन्वयक प्रशांत ढेपे यांच्याशी संपर्क साधावा किंवा ९६५७५४१६३७,८३७९८९८७९८ या क्रमांकावर या विषयाची अधिक माहिती घेता येईल.असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

________________________

शासकीय वस्तीगृह प्रवेशाचे अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.११ जुलै-सामाजिक व न्याय विभाग समाज कल्याण यवतमाळ यांच्या वतीने सन २०२३-२४ या शैक्षिणिक वर्षाकरिता मुला/मुलींच्या शासकीय वस्तीगृह प्रवेशाचे वेळापत्रक जारी करण्यात आले असून ही प्रवेश प्रक्रिया पुर्वी प्रमाणेच ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.

 

या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण १८ शासकीय वस्तीगृह असून यामध्ये ९ मुलांचे ९ मुलींचे आहेत.यापैकी यवतमाळ येथे १ मुलांचे व २ मुलींचे असून मुलांचे नेर १,राळेगाव१,घाटंजी १,पांढरकवडा १,वणी १,उमरखेड१,पुसद १,ईसापूर-दिग्रस १ तर मुलींचे घाटंजी १,वणी १,आर्णी १,पुसद १,उमरखेड १,दिग्रस १,दारव्हा १,असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वसतिगृहाममध्येच पुढील कालावधीत अर्ज करावयाची आहेत.शालेय विद्यार्थांसाठी १२ जुलै २०२३ पर्यंत तर इयत्ता १० वी,व ११ नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून) ३१ जुलै २०२३ पर्यंत तर बी.ए./बी.कॉम/बि.एस.सी.अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवी आणि एम.ए./एम.कॉम./एम.एस.सी.असे पदवी नंतरचे अभ्यासक्रम (व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून)३१ जुलै २०२३ पर्यंत ऑफ लाईन पध्दतीने अर्ज करावे,तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शासकीय वस्तीगृह प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द केले जाईल,असे सहायक आयुक्त समाज,कल्याण भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.

______________________

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करावे- जिल्हाधिकारी

खरीप हंगाम सुरू झाला असुन शेतक-यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. अशावेळी शेतकऱ्यांची अडवणूक न करता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे. जेणेकरून शेतक-यांना पेरणी व इतर शेती कामासाठी सदर निधी उपयोगी पडेल.सर्व पात्र शेतकऱ्यांना बँकेच्या नियमाप्रमाणे लवकरात लवकर पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वाटपाची स्थिती सुधारावी असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे बँकर्स समीक्षा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मार्च २०२३ अखेर संपलेल्या बँकिंग तीमाही आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. सदर बैठकीला जिल्हा अग्रणी बँकचे प्रबंधक अमर गजभिये, भारतीय रिझर्व बॅंकेचे राजकुमार जयस्वाल,जिल्हा विकास अधिकारी,नाबार्ड दीपक पेंदाम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती वैशाली रसाळ, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे,उप क्षेत्रीय प्रबंधक सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रतिभा बहादुरकर, बँक ऑफ बडोदाचे आर.एम.सोमकुवर,भारतीय स्टेट बँकचे सुनील सराटे,युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रतीक कुमार,बँक ऑफ महाराष्ट्रचे अमित नागदिवे,विदर्भ कोंकण ग्रामीण बँकचे पवन हेमनानी,संचालक कु.श्रृती शेंडे,तसेच इतर विविध बँकांचे जिल्हा समन्वयक व सर्व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सन-२०२२-२३ अखेर झालेल्या आर्थिक वर्षातील सर्व सरकारी प्रायोजित उपक्रम व प्राथमिक क्षेत्रातील कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला.

खरीप हंगामाला सुरुवात होताच शेतकरी पीक कर्जासाठी बँकांकडे धाव घेतो, पूर्ण कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्या सर्विस एरियातील गावांच्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करावे. तसेच ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटपात दिरंगाई करतील किंवा विनाकारण त्रास देतील, अशा बँकांवर कडक कार्यवाही करण्यात येईल,असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला. पीक कर्जामध्ये मागे असलेल्या बॅंकांनी सूक्ष्म नियोजन करावे व सर्व पात्र शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर करून त्यांना योग्य वेळी खरीप हंगामा करीता उपयोगी ठरेल असे नियोजन करावे असे सांगितले.

प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्रीमती वैशाली रसाळ यांनी सर्व जिल्हास्तरीय बँकांनी उमेद अंतर्गत कर्ज प्रकरण लक्षांकाच्या १२५ टक्के कर्ज स्वीकृत करून वाटप केलेला आहे,त्याबद्दल माहिती दिली. तसेच सन-२०२३-२४ जिल्हयाला मिळालेले उदीष्टे रु. ३१०.९८ कोटी आहे, ते सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला

यावेळी सन- २०२३-२४ वर्षाच्या वार्षिक ऋण आराखडा पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण प्राथमिक क्षेत्रा करिता रु.५४२५ कोटी व गैर प्राथमिक क्षेत्राकरिता रू.१५०० कोटीचे नियोजन करण्यात आलेले आहे. एकूण वार्षिक आराखडा रू. ६९२५ कोटीचा आहे,अशी माहिती अमर गजभिये यांनी दिली.

यावेळी सर्व शासकीय योजनांच्या आढावा घेतना जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम पीक कर्ज वाटपांच्या यंदाचा आपल्या जिल्ह्याचा पीक कर्ज आज पर्यंत सर्व बँकांनी मिळून खरीफ हंगामा करीता रु.१६९८ कोटी वाटप केलेले आहे. उर्वरित उदीष्ट हे जुलै महिन्यात सर्व बँकांनी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच महात्मा फुले मागास्वर्गीय महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ व इतर मागासवर्गीय महामंडळाच्या योजनांच्या आढावा घेण्यात आला. त्याकरिता जिल्हा उद्योग केंद्र यांनी तालुकास्तरावर सर्व लाभार्थी व पात्र उमेदवारांचे मेळावे आयोजित करून बँकांतर्फे लवकरात लवकर कर्ज वाटप करण्याचे सुनिश्चित करावे. त्याचप्रमाणे विविध मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज प्रकरण अजूनही बँकांच्या कोड मध्ये प्रलंबित आहे ते प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावित, असे जिल्हाधिकारी यांनी विविध योजनेच्या विषयाचा आढावा घेताना संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.

———————-

तहसिल कार्यालय यवतमाळ येथे कोतवाल पदासाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.११ जुलै (जिमाका):-तहसिल कार्यालय,यवतमाळ येथे रिक्त असलेल्या पदाच्या ८० टक्के पदे ही सरळसेवा भरती ने भरण्यात येणार आहे.यामध्ये एकूण ९ पदापैकी ३ पदे महिलांकरिता तर ६ पदे ही अनुसुचित जाती,भटक्या जमाती भज-क भज-ड व, इतर मागास वर्ग व खुला तसेच आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) करीता राखीव आहेत.

यामध्ये पारवा,कापरा,यवतमाळ,बोरीगोसावी,लोहारा,वडगाव रोड,येळाबारा,आकपुरी,हिवरी या गावाकरीता भरण्यात येणार आहे.त्याकरीता अर्ज दि.१२ जुलै ते २१ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजुन १५ मिनिटापर्यंत तहसिल कार्यालय,यवतमाळ येथे सादर करता येईल.प्राप्त अर्जाचे अनुषंगाने लेखी परीक्षा रविवार दि.३० जुलै २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.अर्जचा नमुना तहसिल कार्यालय,यवतमाळ येथे उपरोक्त कालावधीत मिळेल.अर्ज फी रू.१० व अर्ज दाखल करते वेळी परीक्षा शुल्क खुला प्रवर्गाकरीता ५०० रुपये व इतर राखीव सर्व प्रवर्गाकरीता २५० रूपये परीक्षा शुल्क भरणा रोखीने करणे आवश्यक राहील.अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह स्वत:हा कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे पोस्टाने अर्ज स्विकारण्यात येणार नाही. अधिक माहिती करीता तहसिल कार्यालय,यवतमाळ,उपविभागीय अधिकारी यवतमाळ,संबंधित तलाठी साजा व संबंधित ग्रामपंचायत कार्यालय तसेच नगर परिषद,यवतमाळ यांचे कार्यालयाचे सुचना फलकावर जाहीरनामा,पात्रता अटी व शर्तीसह प्रसिद्ध केला आहे.तर तहसिल कार्यालय,यवतमाळ येथे दि. १२ जुलै ते २१ जुलै २०२३ या कालावधीतील प्राप्त अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.अंतिम तारखे नंतर प्राप्त अर्ज स्विकारण्यात येणार नाही.तरी सर्व संबंधित पात्र उमेदवारांनी अर्जदाखल करण्याचे आवाहन तहसिलदार डॉ.योगेश देशमुश यांनी केलेले आहे.

Copyright ©