यवतमाळ सामाजिक

येळाबारा येथे मुंबईच्या “पारिजात , सुगंध जगण्यातला ” या सामाजिक संस्थेद्वारा शालेय किट ( दफ्तर ) साहित्याचे वाटप !

येळाबारा येथे मुंबईच्या “पारिजात , सुगंध जगण्यातला ” या सामाजिक संस्थेद्वारा शालेय किट ( दफ्तर ) साहित्याचे वाटप !

8 जुलै 2023 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येळाबारा येथे मुंबईच्या ” पारिजात सुगंध जगण्यातला ” या सामाजिक संस्था मुंबई द्वारा प्राप्त दफ्तर शालेय किट चे वाटप करण्यात आले , प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.संजय भेदुरकर , उपाध्यक्ष मा.सौ. जयाताई पातालबंशी , माजी अध्यक्ष मा.मनोहर पायताडे , सदस्या श्रीमती पद्माताई पाईकराव , सौ. पुजा इंगोले , प्र.केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक शिवचंद्र गिरी , स. शिक्षक किशोर डाफे , शिल्पा राठोड या सर्वांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना शालेय किट साहित्याचे वाटप करण्यात आले , या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले , सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवल्या बद्दल पारिजात संस्था मुंबई व पारिजात संस्थेचे आदरणीय गुरूदास बाटे , राहुल शिंदे , हर्षद ठाकरे , शशांक ठुकरूल ,स्वप्निल पाथरे , समीर राणे ,सचिन कुसुंदल आणि पारिजात संस्थेच्या सर्व सदस्य तसेच यवतमाळ येथील शिवचंद्र गिरी प्र.केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक येळाबारा यांचे सहकार्य लाभले सर्वांचे जि.प.कें.प्रा.शाळा येळाबारा च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले !

Copyright ©