यवतमाळ राजकीय

शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रविण निमोदिया यांना इंडियन प्राईम आयकॉन अवॉर्ड सिझन २ जयपुर ने सन्मानित

शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रविण निमोदिया यांना इंडियन प्राईम आयकॉन अवॉर्ड सिझन २ जयपुर ने सन्मानित

यवतमाळ : येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तसेच महावीर इंटरनॅशनल यवतमाळ केंद्राचे अध्यक्ष व टिंबर मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रवीण निमोदिया यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल इंडियन ग्लोबल मॅगझिनद्वारा सन्मानित करण्यात येते. यावर्षी यवतमाळ येथील अनेक विविध सामाजिक संघटनांशी जुळलेले व विभीन्न शैक्षणिक संस्थांशी व्‍यापक जनसंपर्क असलेल्या प्रवीण निमोदीया यांना इंडियन प्राईम आयकॉन अवॉर्ड सिझन २ ने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार इंडियन ग्लोबल मॅगझिन संस्थेच्या अध्यक्षा मिस अनुराधा व उपाध्यक्ष दिपक नैय्यर यांनी एका कार्यक्रमात प्रदान केले. प्रवीण निमोदीया यांना इंडियन प्राईम आयकॉन अर्वार्ड सिझन २ ने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे मारवाडी युवा मंच यवतमाळ, नवशक्ती दुर्गा मंडळ यवतमाळ, टिंबर मर्चंट असोसिएशन यवतमाळ व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Copyright ©