Breaking News यवतमाळ

मुलीचा गळा आवरून बोरगाव जंगल येथील झाडावर मुर्तदेह लटकविनाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश

मुलीचा गळा आवरून बोरगाव जंगल येथील झाडावर मुर्तदेह लटकविनाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश

अमरावती ग्रामीण पोलिसांची कामगिरी

यवतमाळ /

दोन दिवसापूर्वी यवतमाळ जिल्हातील बोरगाव जंगल परिसरात मुलीचा खून करून झाडावर मृतदेह लटकविण्यात आला होता.या घटनेची चर्चा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली होती व हे घटना आत्महत्या की खून असा प्रश्न नागरिकांना पडला होता बोरगाव जंगल मधील घटना हि आत्महत्या नसून खूनच होता हे निस्पपण झाले व खुनातील आरोपी पोलिसांच्या हाती आले.

या खूनकांड घटनेत दोन आरोपी असून एक आमरावती जिल्यातील तर दुसरा आरोपी हा यवतमाळ जिल्ह्यातील बबुळगाव तालुक्यातील आहे . या घटनेतील मुख्य आरोपी अमर पांडुरंग राऊत वय २२ वर्ष रा येरढ बाजार ता चांदुर रेल्वे जि अमरावती तर दुसरा आरोपी

अमोल रामचंद्र ठाकरे वय ३१ वर्ष रा दाभा (पहुर )ता बाभुळगाव जि यवतमाळ.

 

सविस्तर वृत्त पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथे दि.०४/०७/२०२३ रोजी पो.स्टे. ला फिर्यादी (पिडतीचे वडील) यानी येवुन जबानी रिपोर्ट दिला की, त्यांची मुलगी ही दिनांक ०३/०७/२०२३ रोजी सकाळी ०९/०० वा. तिचे कॉलेज चांदुर रेल्वे येथे गेली असता ती दिनांक ०३/०७/२०२३ रोजी घरी परत न आल्याने व तिचा फोन बंद येत असल्याने फिर्यादी यांनी पिडीत हिये मैत्रीणीला तसेच नातेवाईकांना फोन करून विचारपुस केली असता तिचा कुठेही शोध लागला नाही. करीता दिनांक ०४/०७/२०२३ रोजी फिर्यादी यांचे जबानी रिपोर्ट वरून पो.स्टे. तळेगाव दशासर येथे अप.क. २४८/२०२३ कलम ३६३ भादवी दि. ०४/०७/२०२३ रोजी गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

दि.०७/०७/२०२३ रोजी पोस्टे यवतमाळ ग्रामीण येथे बोरगाव जंगल परीसरामध्ये पिडीत

मुलीचे प्रेत झाडावर लटकवीलेल्या अवस्थेत मिळुन आल्याने पोस्टे यवतमाळ ग्रामीण येथे मर्ग क

४४/२०२३ कलम १७४ जा .फौ मर्ग नोंद करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयामध्ये तांत्रीक तपास व फिर्यादी यांचे पुरवणी बयानावरुन संशयीत इसमास अमर पारगंजी राउत वय २२ वर्ष रा. येरड बाजार ता चांदुर रेल्वे जि अमरावती यास ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता प्रथम आरोपी याने उडवाउडवीचे उत्तर दिली परंतु अधिक विश्वासात घेवुन त्याला विचारपुस केली असता त्याने वाघुळगाव चे समोर जंगलामध्ये नेवुन पिडीत हिचे सोबत प्रेम संबधातुन वाद झाल्याने आरोपी अमर पांडुरगंजी राउत याने पिडीतिच्याच ओढणीने तिचा गळा आवळुन तिला जिवानीशी ठार करून नंतर त्याच ओढणीने गळयाला बांधुन तिला झाडावर लटकवुन गळफास घेतल्याचा बनाव केला. तसेच आरोपी क. ०२). अमोल रामचन्द्र ठाकरे वय ३१ वर्ष रा. दाभा पहुर ता. बाभुळगाव याला घटनेपुर्वी सदर पिडीत मृतक हिला अमर राऊत हा जिवानीशी ठार मारणार आहे असे माहित असतांना व घटनेनंतर पिडीत हिला दिनांक ०३/०७/२०२३ रोजी जिवाने ठार मारले आहे असे माहित असुनही त्याने सदस्बाब ही लपवुन ठेवली असे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात कलम ३०२, २०१. ११८ भादवी अन्वये कलम वाढ करण्यात आली असुन मा न्यायालय चांदुर (रेल्वे) यांनी सदर दोन्ही आरोपीतांना ०४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असुन पुढील तपास ठाणेदार रामेश्वर धोंडगे पोस्टे तळेगाव द हे करीत आहेत.

सदर ची कामगीरी मा पोलीस अधिक्षक श्री अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक श्री शशीकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुर्यकांत जगदाळे, स्थागुशा पो.नि. श्री किरण वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे तळेगाव द, ठाणेदार सपोनि रामेश्वर धोंडगे, पोउपनि कपिल मिश्रा. पोहेकॉ विजयसिंह बघेल, नापीकॉ श्यामकुमार गावंडे, मनिष आंधळे, सचिन गायधने, पोकॉ अमोल तातड, संदेश चव्हाण, अंकुश पाटील, मनिष कांबळे, अमर काळे, बंडु मेश्राम, जितेंद्र राऊत, कांचन दहाटे, सुवर्णा निभोरकर यांनी केली आहे.

Copyright ©