Breaking News यवतमाळ

प्रियकरांनीच केला प्रेयसीचा घात

प्रियकरांनीच केला प्रेयसीचा घात

खून करून लटकविले होते फासावर दोन दिवसात आरोपी गजाआड

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत बोरगाव शेत शिवारात 7 जुलै रोजी अल्पवयीन मुलीचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला होता सदर मृतकाच्या नातेवाईकांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता मुलीचे नातेवाईकांनी पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथे तक्रार दाखल केली असता येथील पोलिसांनी कलम 263 चा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता या अल्पवयीन मुलीचे प्रेम प्रकरण जीवावर बेतले या प्रेमप्रकरणातून आरोपींनी तिला बोलावून बोरगाव येथे तिचा गळा ओढणीने आवळला व मित्राच्या मदतीने तिने आत्महत्या केल्याचे दर्शविले व ओढणीनेनी तिला एका झाडाला फासावर लटकवले जेणे करून हि आत्महत्या दिसायला पाहिजे असा त्या त्या नराधम प्रियकराचा बेत होता सदर प्रकरणी तळेगाव दशासर पोलीसानी दोन आरोपींनी ताब्यात घेतले यात अमर पांडुरंग राऊत वय 25, रा. खराबी ता.चांदुर रेल्वे,प्रणव गजानन ढाकुलकार वय 25, रां.वाघाडी ता.नादगाव या दोघांनाही पोलिसांनी अटक केले आहे पुढील तपास तळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे पोलीस उपनिरीक्षक कपिल मिश्रा हे करीत आहे सदर गुन्ह्याची उकल अविनाश बारगळ शशिकांत जाधव रामेश्वर धोंडगे कपिल मिश्रा विजय बघेल सचिन गायधने शाम गावंडे मनीष कांबळे गौतम येवले अमोल तातड यांनी या प्रकरणी तपास केला असून सदर गुन्हा हा यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी तळेगाव पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला असून पुढील चौकशी तळेगाव पोलीस करीत आहे

Copyright ©