यवतमाळ सामाजिक

लायन क्लब यवतमाळ पदस्थापना समारोह उत्साहात

लायन क्लब यवतमाळ पदस्थापना समारोह उत्साहात

मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी मनोज जयस्वाल यांची निवड झाल्याबद्दल लॉयन क्लब तर्फे सत्कार

लायन क्लब यवतमाळ ची वर्ष 2023 – 2024 करिता नवीन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा दिनांक 5 जुलै 2023 रोजी सायंकाळी सात वाजता राधा मंगल कलर्स ईन हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी उप प्रांतपाल लायन एम जे एफ डॉ. रीपल राणे तथा झोन चेअर पर्सन लायन मनोहर सहारे यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला. इंस्टालिग ऑफीसर उप प्रांतपाल लायन एम जे एफ डॉ. रीपल राणे यांनी नवनिर्वाचित लायन मंगेश शिरभाते याना अध्यक्षपदाची, लायन संजय देशपांडे याना सचिवपदाची तर लॉयन डॉ. प्रदीपकुमार गिरी याना कोषाध्यक्ष पदाची शपथ घेतली. व मावळते अध्यक्ष लॉयन मनोज अग्रवाल व सचिव लॉयन शरद निमोदिया यांनी आपल्या मागील कार्याचा लेखा-जोगा सादर केला. मावळते अध्यक्ष लॉयन मनोज अग्रवाल, सचिव लॉयन शरद निमोदिया कोषाध्यक्ष लॉयन अशोक पटेल यांच्या कडून नवनिर्वाचित अध्यक्ष सचिव व कोषाध्यक्ष यांनि पदभार स्वीकारला.

या प्रसंगी लायन इंडक्शन अधिकारी व झोन चेअर पर्सन लायन मनोहर सहारे यांनी डॉ गोपाळ ढोमणे व दीपक घरजोडे याना नवीन सदस्यांची शपथ दिली.

याप्रसंगी आयुर्वेदिक कॉलेज यवतमाळ याना रुग्ण उपचारासाठी इलेक्ट्रोटाइड अनॅलाइझर मशीन भेट देण्यात आली. तसेच लायन क्लब डॉ. सदस्यांचा डॉ. डे औचित्य साधून डॉ. सी बी अग्रवाल, एमजेएफ डॉ. राणे, डॉ. मनक्ष्ये लायन डॉ. प्रमोद गिरि, लायन डॉ. राजीव मुंदाने, लायन डॉ. महेश चौहान, डॉ निकिता चौहान यांचा सन्मान करण्यात आला. कोरोना काळात आपली निस्वार्थी सेवा देणारे पियेसी, पाटीपुराचे डॉ. लायन प्रमोद अग्रवाल यांचा ही शाल व फल देउन सत्कार करण्यात .दै. सिंहझेपचे संपादक लायन मनोज जयस्वाल यांची मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कुमारी दिशा राजेंद्र मोगरे, शासकीय तंत्र निकेतन मधून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये प्रथम आल्याबद्दल, साकेत संजय मंत्री यांनी आपली एमबीबीएस पूर्ण केल्याबद्दल, आदित्य मनोज पालडिवाल यांनी न्यु जर्सी, अमेरिकेमधून एम एस पूर्ण केल्याबद्दल तर श्रेयश मनोज जयस्वाल यांनी यमआई टी पुणे येथून इंजिनीरिंग डिग्री पूर्ण केल्या बद्दल त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

नवनिर्वाचित अध्यक्ष लायन मंगेश शिरभाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन लायन मंगला भंडारी व लायन सुरजीत सिंग रावत यांनी जोशपूर्ण अंदाजात केले. तर लायन संजय देशपांडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करीत आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला यवतमाळ लायन्स क्लब चे लायन सुभाष आचलिया, लायन अशोक भंडारी, लायन अभय गांधी, लायन डॉ. सी. बी. अग्रवाल, लायन माधव रुइकर एमजेएफ लायन सुनील जोशी, लायन मंगला भंडारी, लायन नीलिमा मंत्री, लायन राजकुमार अग्रवाल, लायन विजय लाहोटी, लायन दीपा जोशी, लायन नितीन घोसे, लायन कल्पना गांधी, लायन शैलेश सिकची, लायन सुरजीत सिंग रावत, लायन हुक्मचंदजी पालडिवाल, एमजेएफ लायन पुष्पाजी पालडिवाल, लायन डॉ. राजीव मुंदाने व सर्व सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रकल्प अधिकारी म्हणून लायन राजकुमार अग्रवाल विजय लाहोटी यांनी कार्यभार सांभाळला. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख शैलेश सिकची यांनी दिली.

Copyright ©