Breaking News यवतमाळ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केला खून

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केला खून

यवतमाळ  चांदुर रेल्वे तालुक्यामध्ये येणाऱ्या येरड बाजार

येथील बारावी वर्गात शिकणाऱ्या सतरा वर्षीय कुमारी आचल

सुधीर डेहनीकर ही विद्यार्थिनी 3 जुलैपासून दुपारी दोन नंतर

बेपत्ता झाली आज तिचा मृतदेह फाशी घेऊन झाडाला लटकलेल्या

अवस्थेत आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कुमारी आचल सुधीर डेहनीकर

ही मूळची एरडबाजार येथील राहणारी असून ती तळेगाव दशासर येथे शिक्षण घेत होती शिक्षण घेत

असतानाच ती वसा येथे खाजगी कंपनीमध्ये काम करीत होती.दिनांक 3 रोजी ती घरून कॉलेजला जाते असे सांगून गेली साडेबारा वाजता च्या दरम्यान तिचा फोन तिच्या वडिलांना आला. वडील तिच्यासोबत बोलले मात्र यावेळी तिने कोणतीही माहिती दिली नाही.दुपारी दोन नंतर तिचा मोबाईल बंद झाला घरातल्या परिवारांनी आणि वडिलांनी सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून न आल्याने,अखेर मुलगी अज्ञात इसमाने पळून नेली अशा प्रकारची तक्रार तळेगाव दशासर पोलीस स्टेशनला तीन जुलै रोजी दाखल करण्यात आली होती.त्यानंतर तिचा पोलिसांनी शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही .शेवटी आज तिचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी पंचनामा करून वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात शव विच्छेदन करण्यासाठी आणला असून तिचे सर्व विच्छेदन करण्यात आले. आचलच्या पाठीवर मोठ्या प्रमाणात मारल्याचे निशाण दिसून येत आहे तर तिच्या पायाच्या पोटरीवर मोठी जखम असून त्यातून तिचे हाड दिसून येत आहे तिचा निर्दयी पणे अत्याचार करून खून करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे, व याशिवाय नको त्या जागेवर मोठ्या प्रमाणात सूज आल्याने हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे हे देखील तिथे डॉक्टरांच्या लक्षात आले असून त्यांनी तशी माहिती पोलिसांना दिली यावरून तिच्यावर शारीरिक अत्याचार झाला असा निष्कर्ष ग्रामीण पोलिसांनी काढला आहे.कुमारी आचल आणि तिची एक मैत्रीण या दोघींसोबत अन्य दोघेजण

होते. त्या चौघांनी देवगाव चोफुली वर चहा घेतला अशी माहिती तिच्या नातेवाईकांना

मिळाली व तिच्यासोबत असणारा मुलगा बळजबरीने

नेत आहे अशी माहिती तिने तिच्या मैत्रिणीला दिली होती आणि तसे तू

बाबांना सांग असे सांगितले. मात्र त्या मैत्रिणीने ती माहिती तिच्या वडील सुधीर डेहनीकर यांना दिलीच नाही असे तिचे वडील यांनी सांगितले. यावरून तिच्या खुनात मैत्रीण चाही सहभाग असल्याचा संशय बळावला आहे.त्यामुळे या प्रकरणात प्रचंड गुंतागुंतिचे दिसून येत आहे.अशी क्रू पने त्या निरागस मुलीची हत्या करण्यात आली असा पोलिसांचा कयास आहे.यावर आता यवतमाळ ग्रामीण पोलीस आणि तळेगाव दशासर पोलीस अज्ञात व्यक्ती विरुद्ध 363 गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही

पोलीस स्टेशनचे पोलीस घटनेचा तपास करीत आहे.

Copyright ©