यवतमाळ सामाजिक

लाडखेड गाव रामभरोसे शासकीय कर्मचाऱ्यांचा वनवा ग्रा प . लोकप्रतिनिधी निद्रावस्थेत

लाडखेड प्रतिनिधी : प्रदीप मेश्राम

लाडखेड गाव रामभरोसे शासकीय कर्मचाऱ्यांचा वनवा ग्रा प . लोकप्रतिनिधी निद्रावस्थेत

लाडखेड हे दारव्हा तहसीलमधील व पंचायत समिती मधील सर्वात मोठे गाव आहे येथे अनेक शासकीय निम शासकीय कर्मचारी नियुक्ती पूर्ण वेळ एकही कर्मचारी येथे राहत नाही मंडळ अधिकारी चे ही मुख्यालय आहे मंडळ अधिकारी राऊत कधीकधी चमकतात तलाठी प्रभारी आठवड्यातून एक दिवस हजेरी लावतात पोलीस पाटील नाही कोतवाल नाही तसेच ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी विलास हेडाऊ यांची पूर्ण कालीन नियुक्ती असून त्यांच्याकडे बाणायत व कामठवाडा गावचा प्रभाव आहे परंतु जास्तीत जास्त वेळ ते कामठवाडाआणि बाणायत येथे राहतात लाडखेड ला फक्त एक दिवस दोन तास खूप झाले खुर्चीवर अनेक कामे लोकांची खोडमतात सतत गैरहजर असतात येथे गावातील कोणत्याही नागरिकांनी फोन केला असता ते म्हणतात आज मी दवाखान्यात जात आहे दुसरे कारण मी सेवागत मध्ये आहे असे बोलले की सामान्य ग्रामस्थ फोन ठेवून देतात तसेच येथे आयुर्वेदिक दवाखाना असून सुद्धा येथे डॉक्टरची नियुक्ती नाही पावसाळ्याचे दिवस असल्याने रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढ होऊन रुग्णाची संकेत वाढ होत आहे गोरगरीब जनता महागाईने होरफडली असून शासकीय दवाखाना असून सुद्धा डॉक्टरची नियुक्ती नसल्यामुळे दवाखाना ओसाड पडला आहे येथील कृषी सहाय्यक यांचा कुठेही थाक पत्ता लागत नाही तेही दिसेनासे झालेले आहे कृषी विभागाच्या काय योजना कोणत्या योजना आहे येथील जनता यापासून अनाविज्ञ झाली आहे तसेच आरोग्य हिवताप कर्मचारी एम पी डब्ल्यू ची पूर्ण वेळ नियुक्ती असून सदर कर्मचारी तीन महिन्यापासून बेपत्ता आहे वेतन मात्र महिन्याकाठी उचल होत आहे हे विशेष एम एस ई बी चे शाखा अभियंता आठवड्यातून एक दिवस मोठ्या मुश्किलने देतात गावात दिवसातून दहा ते पंधरा वेळा रात्री लाईन चालू बंद होते त्यावर तोडगा मात्र काढल्या जात नाही तसेच लाडखेड येथे एस .टी वाहतुक नियंत्रकाची नियुक्ती असुन संध्या शाळा कॉलेज सुरु झाल्याने विद्यार्थी सवलत पासेससाठी विद्यार्थ्याचे हाल होत आहे तरी येथे त्वरित वाहतुक नियंत्रकाची दारव्हा आगार व्यवस्थापकाने नियुक्ती करावी अशी विद्यार्थी संघटने कडुन मागनी होत आहे लाडखेड परिसराची व लाडखेड गावची ची स्थिती असून एवढ्या मोठ्या गावची प्रगती कर्मचारी नसल्याने कशी होईल तर या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याने लोकप्रतिनिधी निद्रा अवस्थेत असल्याचे नागरिकाकडून बोलले जात आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाडखेड येथील सामान्य आणि गरीब जनतेला न्याय द्यावा आणि गावामध्ये पुर्ण वेळ कर्मचार्याची व्यवस्था करावी अशी मागनी नागरीकाकडून जोर धरित आहे

Copyright ©