यवतमाळ सामाजिक

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये यवतमाळ येथील दानिश ठरला अव्वल

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये यवतमाळ येथील दानिश ठरला अव्वल

यवतमाळ:- अमरावती येथील माजी मंत्री महिला आमदार मा.यशोमतीताई ठाकुर यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमीत्त दिनांक २४ जुन ते २६ जुन पर्यंत आयोजित करण्यात आलेली आमदार चषक २०२३ अंतर्गत 18वी वरिष्ठ आणि मास्टर राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्य राज्यस्तरीय स्पर्धा व निवड चाचणी मध्ये यवतमाळ येथील तरुण बॉडीबिल्डर मोहम्मद दानिश मोहम्मद शकील याने अथक परीश्रमानंतर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये (पुरुष गट) प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले असुन सोबतच त्याना द हाईस्ट टोटल मॅन व स्ट्रॉंग मॅन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोहम्मद दानिश मोहम्मद शकील यांचे अनेक स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव होत असुन त्यानी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिल,मार्गदर्शक व सहकारी मित्राना दिलेला आहे.

Copyright ©