यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षणाची सुरुवात

जिल्ह्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षणाची सुरुवात

मा. मंत्री,महिला व बाल विकास विभाग यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात महिला व मुलींच्या होणाऱ्या निर्घुण हत्या व हिंसाचार याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यास आळा घालण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे व त्यांचे समुपदेशन करण्यासारख्या योजना शासनाच्या विचाराधीन होत्या. त्याअनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षणाची सुरुवात अणे महिला महाविद्यालय येथे दि. ०३.जुलै २०२३ रोजी झालेली असून कार्यक्रमाचे उद्घाटन दुर्गेश कुंटे, प्राचार्य अणे महिला महाविद्यालय यांचे हस्ते करण्यात आले. आज झालेल्या कार्यक्रमामध्ये महिला व मुलींवरील हिंसाचार – संकल्पना व सद्यस्थिती याबाबत स्त्री शक्ती संघटना तसेच महिला व मुलींना तंत्रज्ञानामुळे होणारे धोके याबाबत सायबर सेल तज्ञ अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रशांत थोरात महिला व बाल विकास अधिकारी, यवतमाळ हे लाभले तसेच विकास मुंडे,सायबर सेल प्रमुख, यवतमाळ व श्रीमती वृंदा देशमुख प्रवक्त्या भारतीय स्त्री शक्ती संघटना, डॉ. किशोरी केळापुरे सेवानिवृत्त प्राध्यापिका हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. सदर कार्यक्रम तीन दिवसांकरिता घेण्यात येणार असून पुढील दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सराव घेण्यात येणार आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष गोरे व आभार प्रदर्शन प्रा.दर्शना सयाम यांनी केले.कार्यक्रमाला, शासकीय निरीक्षण गृह (मुलांचे) अधीक्षक गजानन जुमळे, महिला व बाल विकास विभागाचे परीविक्षा अधिकारी रवींद्र गजभिये, संरक्षण अधिकारी श्रीमती रुपाली पांडे व सखी वन स्टॉप सेंटरचे अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी निधी ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयाचे कर्मचारीवृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©