यवतमाळ सामाजिक

लॉयन्स क्लब यवतमाळचा पदग्रहण सोहळा 5 जुलै ला

लॉयन्स क्लब यवतमाळचा पदग्रहण सोहळा 5 जुलै ला

यवतमाल. लॉयन्स क्लब यवतमाळचा पदग्रहण समारोह 5 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्थानीक धामणगांव रोड स्थित हॉटेल राधामंगल कलर्स इन हॉटेल मध्ये आयोजित केला आहे.

लॉयन्स क्लब यवतमाळ हा गेल्या 51 वर्षापासून यवतमाळ मध्ये विविध क्षेत्रात सामाजिक कार्यात कार्यरत आहे. लॉयन्स क्लबची दरवर्षी नवनियुक्त पदाधिकारी निवडले जातात. नुकतीच यवतमाळ लॉयन्स क्लबची बैठक पार पाडली असुन यात नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी मंगेश शिरभाते यांना अध्यक्ष पदाची, संजय देशपांडे यांना सचिव पदाची व डॉ. प्रमोद गिरी कोषाध्यक्ष पदाची शपथ घेतील. मावळते अध्यक्ष मनोज अग्रवाल, सचिव शरद निमोदिया, कोषाध्यक्ष अशोक पटेल यांच्याकडुन पदभार संभाळतील.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून उपप्रांतपाल एम.जे.एफ. डॉ. रीपल राणे, तथा झोन चेअर पर्सन मनोहर सहारे उपस्थित राहतील. या प्रसंगी आयुर्वेदीक कॉलेज यवतमाळ यांना उपचारासाठी इलेक्ट्रोट लाईट अनॅलाइझर मशीन देण्यात येत आहे. तसेच लॉयन्स क्लब के डॉक्टर सदस्यांचा डॉक्टर डे निमित्य सत्कार करण्यात येईल.

लॉयन एम.जे.एफ. पुष्पाजी पालडीवाल यांच्या वतीने गरजू महिलांना साहित्य वाटप करण्यात येईल. या कार्यक्रमाला लॉयन्स क्लब यवतमाळ अॅड. अशोक भंडारी, डॉ. राजीव मुंदाने, नारायण धूत, शैलेश सिकची, रागीनी गावंडे, डॉ. प्रदीपकुमार गिरी, डॉ. प्रमोद अग्रवाल, दिपा जोशी, एम.जी.एफ. सुनील जोशी, विजू खोरिया, अभय गांधी, सुरजीतसिंग रावत, छाटूभाई खेतानी, सुभाष आचलीया, हुकुमचंद पालडीवाल, डॉ. विनोद मनक्षे, एम.जी.एफ. कल्पना गांधी, डॉ. सी. बी. अग्रवाल, नीलिमा मंत्री समस्त लॉयन्स मेंबरर्स उपस्थित राहतील. प्रकल्प प्रमुख लॉयन राजकुमार अग्रवाल, विजय लाहोटी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख डॉ. शैलेश सिकची यांनी कळविली.

Copyright ©