Breaking News महाराष्ट्र

देवळीत आढळला दुर्मिळ गजरा साप

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

देवळीत आढळला दुर्मिळ गजरा साप

सर्पमित्राने दिले दुर्मिळ सापाला जीवनदान

देवळी शहरांमध्ये रविवारी रात्री ८ वाजता च्या दरम्यान तुषार रघाटाटे राहणार कामडी चौक देवळी यांच्या घरामध्ये अचानक दुर्मिळ जातीचा गजरा साप दिसून आला त्यामुळे घरात एकच खळबळ उडाली परंतु या ३ फुटाचा अतिशय सुंदर दिसणारा या सापाला जीवेश मारण्यापेक्षा सर्पमित्र देवळी शहरातील प्रसिद्ध सर्पमित्र रोहित भादीकर यांना दूरध्वनी वरून कळविण्यात आले सर्पमित्र रोहित भादीकर आपल्या चमू सोबत लगेच तुषार रघाटाटे यांच्या घरी पोहोचले आणि या गजरा सापाला पकडून सुरक्षित स्थळी नेऊन सोडलेले सर्पमित्र रोहित भादीकर यांच्या माहितीनुसार हा दुर्मिळ जातीचा बिनविषारी गजरा साप असल्याचे त्यांनी सांगितले या सापाला जीवनदान देणाऱ्या मध्ये सर्पमित्र रोहित भादीकर,आयुष घोडे,यश पचारे,राज कौराती,आदीं सर्पमित्र होते.

Copyright ©