यवतमाळ सामाजिक

महावीर इंटरनॅशनलतर्फे आयोजित डान्स स्पर्धेला अभूतपुर्व प्रतिसाद

महावीर इंटरनॅशनलतर्फे आयोजित डान्स स्पर्धेला अभूतपुर्व प्रतिसाद

२ जुलै रोजी टिंबर भवन यवतमाळ येथे सकाळी ९.३० वाजतापासून महावीर इंटरनॅशनल यवतमाळ कमलदेवी एज्यू फाउंडेशन यवतमाळ सुदर्शन वास्तू शास्त्र फाउंडेशन यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने विभीन्न गटामध्ये आयोजित भव्‍य डान्स स्पर्धेला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाले. या डान्स स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिध्द भगंदर तज्ञ डॉ.अंजली गवार्ले , महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष प्रवीण निमोदीया, पोलिस निरिक्षक सतीश चवरे यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रंसगी डान्स स्पर्धेमध्ये सोलो डान्समध्ये वयोगटात ५ ते १० आरोही बोरुंदीया, विवाण खांदवे, तेजस वानखडे, तर वयोगट ११ ते १८मध्ये अनमोल माळकुटे, ज्ञाप्ती हर्षे, नारायणी बोरकर तर वयोगट १८ ते ओपनमध्ये लोकेश मडावी, शालू राठोड, मोहीनी हजारे, तर ग्रुप डान्समध्ये वयोगट ५ ते १६ लंयगीका ग्रुपमध्ये, नृत्यदर्पण कोळी ग्रुप, श्रीराजस्थानी ॲकेडमी ग्रुप, वयोगट १६ ते ओपन गटामध्ये नटराज नृत्य साधना ग्रुप कालबेलीया ग्रुप, पेरकी महिला ग्रुप,अनुक्रमे प्रथम द्वितीय, तृतीय क्रमांकाचे रोख पुरस्कार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र जिंकले. त्यांना हे पुरस्कार डॉ. सारीका शाह यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. संतोष डोंगरे, डॉ. किरण खडसे मॅडम, आरती येळणे हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष प्रवीण निमोदीया, सचिव शोभा दोडेवार, कमलादेवी तेजू फाउंडेशनच्या अध्यक्षा वर्षा चव्‍हाण, सुदर्शन वास्तू शास्त्र यवतमाळचे संचालक डॉ. गोपाल ढोमणे, राजेश भूत, संगीता पिपराणी, ॲड. रिना वर्मा, श्याम भंसाली, हर्षल यंबरवार,सुलभा चाणेकर, शेखर बंड, शरद निमोदिया, उज्ज्वला भाविक, माधुरी जैन, शिवाणी गुगलीया, श्वेता जयस्वाल, प्रदीप सिंग नन्नरे, रवीकुमार निमोदीया, राजेश चावरे, उमेश पोद्दार, महेंद्र बोरा, नरेश नलवाणी, डॉ. आनंद भंडारी, विनोद महाजन, जवाहर कोठारी, चंचल कोठारी, डॉ. ललीता घोडे, मनोज अग्रवाल, प्रमोद राठोड, शालू जाधव, जयश्री राठोड, मंदा गोडदे, चित्रा जाधव आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचलन हर्षल यंबरवार व उज्ज्वला भाविक यांनी केले. तर आभार प्रदर्शन शोभाताई दोडेवार यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नृत्यप्रेमी, नागरिक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणार

नृत्य स्पर्धेला यवतमाळकरांनी दिलेल्या अभूतपुर्व प्रतिसादानंतर महाविर इंटरनॅशनल केंद्राच्यावतीने लवकरच सामाजिक क्षेत्राच्या उत्थानासाठी नाविण्यपुर्व उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रविण निमोदिया यांनी सांगितले.तर चालु शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुध्दा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Copyright ©