यवतमाळ सामाजिक

ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पी. एल.शिरसाट याची जयंती साजरी

ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पी. एल.शिरसाट याची जयंती साजरी

स्व. पि एल शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाचे जनक यांची जयंती आज ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यालयात साजरी करण्यात आली नंतर वृक्ष रोपण कार्यक्रम घेण्यात आला या वेळी ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक पी एल शिरसाट यांनी ग्रामीण भागातील पत्रकार निर्माण करून त्यांचे संघटन उभे केले व ग्रामीण पत्रकारांना न्याय हक्कासाठी विधान भवनावर अनेक वेळा मोर्चे काढले अनेक पत्रकारांन करीता आंदोलन केले व न्याय मिळवून दिले त्यांच्या जीवना विषयी अनेकांनी प्रकाश टाकला या वेळी शिवसेनेच्या जिल्हा संघटीका कल्पना ताई दरवई ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके,पवन धोत्रे, दतूभाऊ कुशावार,प्रवीण बोरकर,अमृत पटेल, पवन गावंडे,सतीश पटेल अश्विनी उगले, उपस्थित होते.

Copyright ©