यवतमाळ सामाजिक

“दर्जा” वाढूनही आर्णी अंतरगाव महत्त्वाचा रस्ता जैसे-थे

“दर्जा” वाढूनही आर्णी अंतरगाव महत्त्वाचा रस्ता जैसे-थे

मागील वर्षी आर्णी व अंतरगाव च्या नागरिकांनी सदर महत्त्वाच्या पांदण रस्त्याचा विषय उचलून धरल्याने व तशा बातम्या माध्यमातून प्रकाशित झाल्यामुळे तसेच याची दखल प्रदीप वानखेडे व जिल्हापरिषद सदस्या स्वाती येंडे यांनी घेतल्याने शासन खडबडून जागे झाले होते व सदर महत्त्वाच्या पांदण रस्त्याला “गावाचा रस्ता” असा दर्जा देण्यात आला तसेच रस्ता दुरुस्तीसाठी पैसेही मंजूर झाल्याचे माहिती मिळाली होती पण पाणी कुठे मुरले समजले नाही, अजूनही काम सुरू व्हायचेच आहे.

आर्णी ते अंतरगाव जाणारा पांदण रस्त्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे, या पांदण रस्त्याने जाऊन आपली शेती करणारे शेकडो शेतकरी व या शेतात राबणारे शेकडो मजूर या पांदण रस्त्या मुळे त्रस्त आहे, आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी बावीस फुटाचा रस्ता

अतिक्रमण करून कुंपण केले आहे.

या अतिक्रमित समस्येमुळे या पांदण रस्त्याची

दुरुस्ती करता येत नाही, काही वर्षाआधी एका ठेकेदाराने या रस्त्याची काही मीटर अंतर थाथुर माथूर दुरुस्ती करून रस्ता अर्धवट सोडून दिला व एका पावसाने जैसे थी अवस्था झाली, पावसाळ्याच्या दिवसात तर या

रस्त्याने जाणे म्हणजे तारेवरची कसरत आहे, जागोजागी मोठं मोठी खड्डे पडलेली असून पावसाळा संपेपर्यंत कोणाच्याच शेतात वाहन जात नाही

, त्यामुळे रासायनीक खते, व फवारणी करणे कठीण होत आहे शेतक-यांना रासायनिक खते

डोक्यावर न्यावे लागते मजूर वर्ग या रस्त्यामुळे शेतात यायला धजावत नाही, या सर्व गोष्टीचा विपरीत शेतातील उत्पन्नावर होत आहे, अनेक अल्प भूधारक व लहान शेतकरी कोर्ट कचेऱ्याच्या भानगळी परवडणारे नाही म्हणून अनेक वर्षांपासून हा अन्याय सहन करीत आहे, त्यामुळे महसूल प्रशासनाने यात हस्तक्षेप करून हा रस्ता मोकळा

करून द्यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून आहे पण अद्याप या बाबीकडे महसूल प्रशासनाचे लक्ष दिसत नसल्याने हा पानंद रस्ता येथील शेतकरी शेतमजुरासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सदर रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी याभागातील शेतकरी व ज्येष्ठ पत्रकार रफिक सरकार यांनी केली आहे. अंतरगाव रस्त्या सारखीच अवस्था महत्त्वाच्या आर्णी ते कुऱ्हा पांदण रस्त्याची झाली आहे.

Copyright ©