Breaking News यवतमाळ

जोडमोहा येथे भिषण पाणी टंचाई गेल्या 15 दिवसा पासून हंडा भर पाण्यासाठी महिला करतात मिलो-मिल भटकंती

जोडमोहा /प्रतिनीधी

जोडमोहा येथे भिषण पाणी टंचाई गेल्या 15 दिवसा पासून हंडा भर पाण्यासाठी महिला करतात मिलो-मिल भटकंती

प्रशासनाच्या हलगर्जी व दुर्लक्ष धोरणामुळे जोडमोहा येथील नागरिकांना

हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ.पाण्याची भीषण अवस्था सरपंच सदस्य व सचिवांच्या हलगर्जी पना मुळे डोळ्यात पाणी घेउन नागरिकांचा आरोप.

जोडमोहा गावात पाण्याची भिषण टंचाई जानवत

असतांना या बाबतच्या तोंडी सूचना समंधित सरपंच व ग्रामसेवक यांना देवून सुद्धा समंधित ग्रामसेवक व सरपंचांनी डोळेझाक करीत या प्रश्नावर कुठला ही तोडगा न काढता नागरिकांनाच दमदाटी करून माघारी पाठविले असे आरोप सुद्धा ग्रामसेवक व सरपंचावर होत आहे.सदस्यांच्या मध्येस्थिने ग्रामस्थांची समजूत घालून आठ दिवसात पाणी प्रश्नावर मात करण्याचे आश्वासन सरपंच व ग्रामसेवक यांनी दिले होते. परंतु पंदरा दिवसापासून पाणी प्रश्नावर कुठलाही तोडगा काढण्यात आला नाही. जोडमोहा तेथील पाणी प्रश्नावर स्थानिक प्रशासनाकडून कुठल्याही उपाय योजना होताना दिसून येत नाही या विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तात्काळ पाणी प्रश्न सोडवावा अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे .

ग्रामस्थांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतांना पिण्यासाठी पाणी विकत घेण्याचे पैसे मोजावे लागत आहे. आज रोजी ग्रामपंचायत यांच्या हलगर्जीपना मुळे पाणी विकत घेण्याचा प्रसंग जोडमोहा ग्रामस्थांवर आलेला आहे ह्या सर्व बाबी गट विकास अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी जोडमोहा येथिल ग्रामस्थांनी केली आहे ग्रामसेवक यांनी जोडमोहाला वाऱ्यावर सोडले आहे अशी चर्चा गवकऱ्या मध्ये होत आहे. आज रोजी ग्रामपंचायत यांनी पाणी उपलब्ध करून दिले नाही तर महिला घागर मोर्चा काढून उग्र आंदोलन करू असा इशारा जोडमोहा येथील संतप्त नागरिकांनी दिला आहे

Copyright ©