महाराष्ट्र शैक्षणिक

उन्हाळी सुट्टीनंतर चिमुकल्यांनी गजबजल्या शाळा

देवळी ता.प्रतिनिधी:सागर झोरे

उन्हाळी सुट्टीनंतर चिमुकल्यांनी गजबजल्या शाळा

घंटा वाजली शाळा सुरु झाली

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा गोड आनंदी दिवस.

उन्हाळी सुट्टीनंतर चिमुकल्यांनी गजबजल्या शाळा

उन्हाळी सुट्टी नंतर गेल्या दीड-दोन महिन्यांपासून विद्यार्थ्याविना ओस पडलेल्या घंटा वाजून शाळा सुरु झाल्या.अशातच कोल्हापूर (राव) येथील नवजीवन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवशी मूलांचे त्यांच्या पालक उपस्थित पूष्प गूच्छ देवून शाळेत प्रवेश घेण्याचे निमत्रण देवून मूलांना शिक्षण म्हणजे काय ,तसेच खेळ,व इतर विषयावरील उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून मूले मोहित झाली.
शाळेच्या पहिल्या दिवशी मूले शाळेत येणार याचे औचित साधून नवजीवन शिक्षण संस्था नी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सूरेश राऊत,प्रमूख उपस्थिती एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यसंघ अधिकारी सूनिल कायदे, सामाजिक कार्यकर्ते राजू वाटाणे,पालक सौ.ललिता देवनळे उपस्थित होते या वेळी १ ते १० विच्या विद्यार्थ्याना पाठ्यपुस्तके,गणवेश ,पेन पेन्सिल,देण्यात आले व विद्यार्थ्यांना मान्यवरानी क्रिडा साहित्याची माहिती पटवून दिली व शैक्षणिक साहित्याची पाहणी करून विद्यार्थ्यांचा त्यांच्याकडून परिचय करून घेतला व शाळा परिसरात वृक्षा रोपन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन महादेव तेलंगे ,प्रास्ताविक मूख्य ध्यापक नितीन खोडे,आभार कू.वनिता पंधराम यांनी केले
यशस्वितेसाठी प्रामिकच्या मूख्यध्यापीका कू. कलिंदा किन्हाके, सूनिल वटे,कूणाल राऊत व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिऋम घेतले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©