यवतमाळ सामाजिक

सनातन संस्थेच्या वतीने यवतमाळ आणि वणी येथे 3 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !

सनातन संस्थेच्या वतीने यवतमाळ आणि वणी येथे 3 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !

एक हजारपटीने कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ घेण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’त सहभागी व्हा ! सनातन संस्थेचे आवाहन!

यवतमाळ हिंदु राष्ट्र अर्थात धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, ही काळानुसार सर्वोत्तम गुरुसेवाच आहे. हा संदेश देण्यासाठी ‘सनातन संस्थे’च्या वतीने यंदा 3 जुलै 2023 या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ आणी वणी येथे 3 ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ ! राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्कार्य गुरु-शिष्यांनी केल्याचा गौरवशाली इतिहास भारताला लाभला आहे. त्या त्या काळी अधर्म माजला असतांना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडून, आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या आणि शिवछत्रपतींनी संत तुकाराम महाराज अन् समर्थ रामदासस्वामी यांच्या कृपेने आदर्श असे धर्माधिष्ठित राज्य स्थापन केले. आजही राष्ट्र आणि धर्म यांची दुःस्थिती झाली आहे, यावर एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे हा होय. यासाठी यवतमाळ येथे साई सत्यज्योत मंगल कार्यालय, आर्णी रोड, भातृ मंडळ विठ्ठलवाडी पिंपळगाव तर, वनी येथे एस. बी. लॉन वरोरा रोड या ठिकाणी सायं. 5.30 वाजता गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन); समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार; तसेच ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन, तसेच ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’, विविध विषयांवरील अध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

तरी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहून या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातनच्या वतीने करण्यात आले आहे.

Copyright ©