यवतमाळ सामाजिक

दिग्रस दारव्हा रस्त्याचे भिजत घोंगडे कायम

दिग्रस दारव्हा रस्त्याचे भिजत घोंगडे कायम

४८ तासात नाल्याची समस्या निकाली न काढल्यास छेडणार तीव्र आंदोलन

विविध अभिनवप्रकारे आंदोलन करणार

गेल्या जवळपास आठ वर्षापेक्षा जास्त काळापासुन दिग्रस दारव्हा रोडचे काम संथ गतीने सुरू आहे. दिग्रस पासुन दारव्हा पर्यंत अजुन पर्यंत पुर्ण काम झालेले नाही. दिग्रस पासून ६ किलोमिटर अंतरावर मांडवा गाव आहे. गावातील महादेव मंदीर तथा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या पासुन ते गोपाळपुराकडे जाणारा रस्ता आता पर्यंत दोनदा दुरूस्त करुन सुध्दा रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत तसेच वाहतुकीमुळे रस्त्यालगत असलेल्या घरामध्येप्रचंड धुळ जात असते तसेच महादेव मंदीर पासुन ते मांडवा बसस्थानकापर्यंत असलेल्या नाल्या अजुन पर्यंत पुर्ण केलेल्या नाही गावाच्या बाजुने असलेली नालीचे काम अर्धवट झालेले आहे. व सदर नालीचे बांधकाम व्यवस्थितरित्या झालेले नाही. दिग्रस दारव्हा रोडवरील शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याकरीता सुविधा नसुन शेतीतल्या नाल्या व्यवस्थीत केलेल्या नाही. त्यामुळे रोड लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. ४८ तासात काम सुरूवात करुन एका महिन्यात मांडवा येथील संपुर्ण काम पुर्ण करुन देण्यात यावे असे न झाल्यास अभिनव आंदोलन करण्यात येईल जसे विद्युत पोल वर चढणे जिवंत विद्युत ताराला स्पर्श करणे, जल समाधी घेणे टॉवर वर चढुन खाली उडी मारणे किंवा या व्यतिरिक्त ईतर काहीही सुध्दा करु शकतो असे निवेदन प्रदेश सरचिटणीस ग्राम संवाद सरपंच संघाचे यादव वसंतराव गावंडे, ग्रामपंचायत मांडवा सरपंच सौ. मनिषा यादव गावंडे, सदस्य सौ.कविता देवानंद ठाकरे व सामाजिक कार्यकर्ता देवानंद आनंदराव ठाकरे यांनी दि.२७ जून २०२३ रोजी राष्ट्रीय महामार्ग विभाग अकोला कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

 

मांडवा येथील लक्ष्मण पारधी व तुकाराम डहाके यांच्या घराजवळील नालीचे बांधकामामुळे गावातील सांडपाणी व्यवस्थीत वाहुन जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यात लोकांच्या घरासमारे पाणी साचुन आहे. तसेच नालीवरुन गावात जातांना नाली व रोडच्या मध्ये रपटे न टाकल्यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावात भांडण तंटे वाढत आहे. आपआपसात भांडण होत आहे. त्यामुळे आम्ही सदर रोडमुळे त्रस्त झालो आहे. बस स्टँड समोरील नाली सुध्दा तिच परिस्थिती आहे. अशा या दिग्रस दारव्हा रोडच्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे मांडवावासी व ग्रामपंचायत प्रचंड त्रस्त झाले आहे. अर्धवट कामामुळे बस स्टँड समोरील प्लॉटमध्ये सुध्दा पाऊसामुळे प्रचंड हाल होतात लोकांच्या घरात पाणी जाते. अशा परिस्थतीमुळे ग्रामपंचायत हतबल झाली आहे. सदर कंत्राटदाराला संपर्क करायला गेले असता संपर्क होत नाही. सदर काम लवकरात लवकर सुरू करावे सद्या पावसाळा सुरू झालेला आहे तरी प्रशासनाने याची वेळीच दखल घेवुन पुढील अनर्थ टाळावा असे निवेदन दिले आहे.

Copyright ©