यवतमाळ सामाजिक

पशु सेवा करणाऱ्या ओलावा फाउंडेशन चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

पशु सेवा करणाऱ्या ओलावा फाउंडेशन चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

जीवदया आणि मुक्या प्राण्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून अशा प्रकारची सेवा करणाऱ्या ओलावा फाउंडेशनच्या सर्व तरुणांचे मी कौतुक करतो आणि त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन देतो. तसेच शहरवासीयांनी सुद्धा या मुक्या जनावरांची सेवा करणाऱ्या संस्थेला मदत करावी असे आवाहन श्री, प्रकाशजी चोपडा (ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट) यांनी ओलावा फाउंडेशनच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करताना केले.

यवतमाळ शहर आणि परिसरात गेल्या तीन वर्षापासून सातत्याने मुके पशु आणि पक्षी यांच्यासाठी मदत आणि बचाव कार्य करून आजवर शेकडो पशू पक्ष्यांचे प्राण वाचवून आपल्या सेवेचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या ओलावा फाउंडेशनचे कौतुक कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून श्री, अजय मुंदडा प्रा. डॉ. नारायण मेहरे, सुरेशभाऊ राठी, विजय मुंदडा , हर्षद लुनावत, दर्शन जाजू यांनी केले.

बालाजी सोसायटी मधील जेष्ठ नागरिक भवनात रविवार दिनांक 25 जूनला दुपारी पार पडलेल्या या कार्यक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.आलोक गुप्ता यांनी प्रास्ताविक केले.पाहुण्यांचे स्वागत दीपक बागडी,डॉ. माया गायकवाड यांनी केले. कार्यक्रमात ओलावा फाउंडेशनने गेल्या तीन वर्षांमध्ये केलेल्या पशु सेवे बाबतचे वृत्तचित्र दाखवण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. घनश्याम दरणे आणि आभार

स्वप्नील डेरे यांनी मानले. कार्यक्रमाला

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमेध कापसे स्वप्निल डेरे, कमलेश पेंडले, निलेश पेंडले बादल कंडारे , पवन दाभेकर कैलाश पटले, तेजस भगत, सचिन काकडे, भूषण घोडके मयंक अहिर,डॉ. पूजा कळंबे रिया लांडे आदींनी परिश्रम घेतले.

Copyright ©