यवतमाळ सामाजिक

रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन

रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय यवतमाळ येथील रक्तपेढी मध्ये सध्या स्थितीत रक्ताचा तुटवडा आहे. या ठिकाणी सिकलसेल, एनिमिया, थॅलेसेमिया, गर्भवती माता तसेच अन्य आजारांनी ग्रासलेले रुग्ण असतात. त्यांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते परंतु खाजगी रक्तपेढीतून रक्त विकत घेने शक्य होत नाही.

सुर्जीत सिंग राठोड या रुग्णसेवकाकडून या गंभीर परिस्थितीचा आढावा घेऊन आम आदमी पार्टी यवतमाळ जिल्हा तर्फे सोमवार दि. 03 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय यवतमाळ येथील रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम प्रामुख्याने आम आदमी पार्टी चे पश्चिम विदर्भाचे उपाध्यक्ष (भाई अमन) यांच्या मार्गदर्शनात, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष वसंतरावजी ढोके (सर) यांच्या नेतृत्वात, यवतमाळ तालुका अध्यक्ष मोबीन शेख व यवतमाळ तालुका सचिव कविश्वर पेंदोर प्रामुख्याने यांच्या पुढाकाराने तसेच (आप) च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने घेण्यात येत असून आम आदमी पार्टी यवतमाळ जिल्हा तर्फे रक्तदान करण्यास इच्छुक सर्व बांधवांना विनंती करण्यात येते की, जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याकरीता तातडीने नाव नोंदणी करावी.या करीता

संपर्क मोबीन शेख, यवतमाळ तालुका अध्यक्ष. 7262910786

कविश्वर पेंदोर, यवतमाळ तालुका सचिव 8379808834

Copyright ©