यवतमाळ राजकीय

आणीबाणीत लढा देणाऱ्या योद्ध्यांची शासन व भाजपास जाणीव आहे .आ.येरावार

आणीबाणीत लढा देणाऱ्या योद्ध्यांची शासन व भाजपास जाणीव आहे .आ.येरावार

भारतीय लोकतंञास नरव लावणाऱ्या आणीबाणीच्या अंधार प्रवास विसरणे शक्य नाही. ज्या हजारो देश भक्तांनी, घरावर तुळशीपत्र देऊन हुकूमशाहीची लढा दिला, सत्याग्रह केले, व प्रदीर्घ कारावास भोगला, त्यांच्या कष्टानेच आज हे दिवस आले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात नवा समृद्ध भारत महाशक्ती म्हणून पुढे येत आहे. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार व भारतीय जनता पार्टीस यांची जाणीव आहे, म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज मी आलो असल्याचे यवतमाळचे आमदार मदनभाऊ येरावार म्हणाले.

भारतीय इतिहासात नोंद झालेल्या दि २५ जून १९७५ च्या काळ्या दिवशी स्थानीय महिला विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील लोकतंत्र सेनानींचा आ. येरावार यांनी सत्कार केला. विशेष म्हणजे त्यांनी मंचावरून खाली उतरून लोकतंत्र सेनांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आ. मदन येरावार यांचे बुके देऊन मनोहर देव यांनी स्वागत केले.

याप्रसंगी लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष लक्ष्मणलाल खत्री अध्यक्षस्थानी होते, सोबत मंचावर आ. मदन येरावार, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डाँ.अशोक गिरी व सेनानी संघाचे प्रदेश सदस्य अरुण भाऊ भिसे होते.

भारतमाता व लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले.

आणीबाणीची माहिती देऊन अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाने केलेल्या कार्याची माहिती दिली तर आणीबाणीतील संघर्ष पर्वात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार व इतरही पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या कार्याची वयोवृद्ध नेते रफिक रंगरेज यांनी दिली.

कार्यक्रमाचे संचालन भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेश पडगिलवार व शहर उपाध्यक्ष शंतनू शेटे यांनी केले.

या प्रसंगी आ. येरावार यांनी जेष्ठ नेते डॉ. अशोक गिरी, लक्ष्मणलाल खत्री, दिलीप कासलीकर, अरुण भिसे डॉ. श्रीधर देशपांडे, पांडुरंग झिंजुर्डे, मनोहर देव, मुकुंदराव कदम ,सौ. दीप्ती मुळे, रफिक रंगरेज, नीलिमा इंगोले (वणी), बाबाराव जगताप, नामदेव पवार, अनंत कदम (आरंभी ता. दिग्रस) मारुतीराव गुरमुले (घाटंजी), मुकुंदराव कदम (घाटंजी), अनुराधा देशपांडे (दिग्रस), उमाताई देशपांडे (पुसद), कौशल्याबाई पांडे (दारव्हा), शेषरावजी रिठे (पाटणबोरी) यांचा सत्कार करण्यात आला

Copyright ©