यवतमाळ सामाजिक

दिग्रस येथे मोदी @9 संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

दिग्रस येथे मोदी @9 संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

दिलेले आश्वासन पाळण्यात भाजपा सरकार यशस्वी प्रवीण गांधी C.A

दिग्रस शहरातील श्री बालाजी मंदिर सभागृहात भारतीय जनता पार्टी दिग्रस विधानसभा तर्फे भाजपा तालुका व शहरच्या वतीने मोदी @9 या कार्यक्रमाअंतर्गत व्यापारी व प्रबुद्ध नागरिक संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपा व्यापारी आघाडीचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष रवी ग्यानचंदाणी अध्यक्ष म्हणून लाभले. प्रमुख वक्ते म्हणून चार्टर्ड अकाउंटट प्रवीण गांधी उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष महादेव सुपारे, दारव्हा भाजपा तालुका अध्यक्ष घनश्याम वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने जून महिन्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर ‘विशेष जनसंपर्क अभियान’ राबविल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यात देखील मोदी @९- व्यापारी व प्रबुद्ध नागरिक संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी रविंद्र अरगडे, संदीप झाडे, प्रमोद बनगीनवार, मनोज राठोड, सौ. अल्फा जैन, कु. कल्पना पवार यांच्यासह दिग्रस भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, व्यापारी आणि कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

Copyright ©