यवतमाळ सामाजिक

आझाद नारी फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम महिला सक्षमीकरणाला चालना.!

आझाद नारी फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम महिला सक्षमीकरणाला चालना.!

“शिक्षण प्रशिक्षण व रोजगार एकाच छताखाली”

महिला, युवती मुलींना शिक्षना सोबत स्वयंरोजगारचं ज्ञान असावें त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं स्वावलंबी तसेच महिला सक्षमीकरण व्हावं यासाठी आझाद नारी फाउंडेशनच्या वतीने सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात, आता सुद्धा गावपातळीवर शिलाई मशीन , फॅशन डिझायनिंग व ऍडव्हान्स ब्युटी पार्लर हेअर स्टाईल इत्यादी प्रमाणपत्र कोर्स गावामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. आज या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन श्रद्धा सिसोदिया यांचे हस्ते झाले तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आम्रपाली शेगोकार, शशिकला सुरवाडे, शारदा टिकार, नाजीया शेख, प्रतिभा सुरवाडे जाधव ताई, ह्या उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे संचालक राहुल सुरवाडे यांनी सांगितले की, खेड्यातील महिलांचे शिक्षण आणि रोजगार यातील दरी वाढत चालली असताना, महिलांना खरोखरच सक्षम व स्वावलंबी केले जावे यासाठी पुढाकार घेऊन शासनाच्या महिला सक्षमीकरण धोरणाला बळ देण्याचं काम संस्थेच्या वतीने हाती घेतले आहे. जें जिल्हा भर राबविण्यात येणार असुन महिलांना शिक्षण प्रशिक्षण व रोजगार ह्या तिन्ही गोष्टी एकाच छताखाली देण्याचा संस्थेचा उद्देश आहे.

यावेळी पूजा सुरवाडे, सोनाली इखारे, लक्ष्मी,दिक्षा प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. संचालन-पल्लवी अवचार यांनी केले तर आभार हर्षानी मानले

Copyright ©