यवतमाळ सामाजिक

माणुसकी च दुसरं नाव संकल्प फाउंडेशन

माणुसकी च दुसरं नाव संकल्प फाउंडेशन

मध्यमवर्गीय कुटुंबाला वाचविण्यासाठी संकल्प फाउंडेशनची धडपड

सविस्तर वृत्त असे की, एक उच्चवर्णीय व मध्यमवर्गीय कुटुंब, कुटुंबात 30 वर्षीय कमल जी पोलिओग्रस्त आहे, तिचा पस्तीस वर्षीय नवरा मानसिक रोगी आहे, वृद्ध सासऱ्यांना पायाला जखमेच गँगरीन आहे, सासू म्हातारी आहे, आणि अशातच साडेचार वर्षीय सुंदर अशी स्वराली नावाची कन्या ( सर्व नावे काल्पनिक आहे ) हाताला काम नाही, घरात अठरा विश्व दारिद्र्य, निरोगी आरोग्याचा पत्ता नाही, अशातच महिनाभरापूर्वी संकल्प फाउंडेशन ला फोन आला, व ह्या कुटुंबाने मदतीची याचना केली, लगेच संकल्पची टीम महिनाभरा पूर्वी ह्या कुटुंबाची शहानिशा करण्याकरिता ओम सोसायटीमध्ये पोहोचली असता, एका सभ्यगृहस्थाकडे हे कुटुंब भाड्याने राहात असल्याचे कळले, परंतु कुटुंबाची अशी वाताहत असल्यामुळे संबंधित घरमालक त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे भाडे घेत नव्हते, फेब्रुवारी 2023 पर्यंत पोलिओ ग्रस्त असलेल्या कमलच्या भरवशावर मेसचे डबे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा, परंतु दुर्दैवाने कमल पोलिओ ग्रस्त असलेल्या पायावर पडल्यामुळे तिचे दोन ऑपरेशन सरकारी दवाखान्यात झाले होते, परंतु फेब्रुवारीपासून बेडवरून उठू शकत नसल्यामुळे संपूर्ण कुटुंब नकारात्मक अवस्थेकडे पोहोचले होते, ज्या दिवशी आम्ही ह्या कुटुंबाकडे गेलो, त्या दिवशी त्यांच्याकडे अन्नाचा दाणा सुद्धा नव्हता, संकल्प फाउंडेशन च्या वतीने लगेच सिलेंडर तेल डाळ तांदूळ गहू व किराणा देऊन या कुटुंबाला भुकेच्या जीवनाचा आधार दिला खरा, परंतु नकारात्मकतेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी, अनेक गोष्टी ह्या महिन्याच्या दिवसांमध्ये संकल्प फौंडेशनला कराव्या लागल्या, त्यात चिमुकल्या स्वरालीचा पुढच्या वर्षीपासून ते दहाव्या वर्गापर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च संकल्प फाउंडेशन च्या वतीने करण्यात येणार आहे, त्यासाठी पालकत्व अवधूत वाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे हे स्वीकारणार आहे, त्यानंतर स्वरालीला अनिल गायकवाड यांच्या मदतीने बाल संगोपन योजनेतून दरमहा 2250 रुपयाचा लाभ मिळणार आहे, तसेच अपंग योजनेतून कमलला सुद्धा लाभ मिळणार आहे, ह्या सर्व प्रक्रिया युद्ध स्तरावर संकल्प फाउंडेशन च्या वतीने सुरू असून, कमलच्या पायामध्ये काही त्रुटी राहिल्यामुळे ती अंथरुणावर खीळून होती, या संदर्भात संकल्प फाउंडेशन च्या वतीने शासकीय रुग्णालयाचे प्रतिष्ठित व समाजशील डॉ जय राठोड यांच्याशी चर्चा करण्यात आली, संबंधित कुटुंबाची सर्व माहिती, परिस्थितीचे गांभीर्य डॉक्टरांना लक्षात आल्यानंतर डॉ जय राठोड यांनी संकल्प फाउंडेशन च्या मदतीने कमल हिच्या उपचाराला सुरुवात केली सर्व रिपोर्ट झाल्यानंतर आज कमलवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली, त्याकरिता रक्ताची गरज त्यामुळे संकल्प फाउंडेशनचे उदय सरतापे यांनी रक्तदान केले, दरम्यानच्या काळात या कुटुंबामध्ये सकारात्मकता यावी याकरिता संकल्प फाउंडेशन ची टीम रोज या कुटुंबाकडे जाऊन आधार देत होते, रवी ठाकूर यांनी चिमुकल्या स्वरालीला चॉकलेट बिस्किट खेळणी चप्पल अशा विविध वस्तू दिल्या, मनोज तामगाडगे ह्या संकल्प फाउंडेशनच्या सदस्यांचा वाढदिवस त्यांनी कमलला साडी व स्वरालीला फ्रॉक देऊन साजरा केला, या सर्व घटनांमुळे संबंधित कुटुंब हळूहळू सकारात्मकते कडे वळले असून, गेल्या पंधरा दिवसा पूर्वी शासकीय रुग्णालयामध्ये भरती असलेल्या सविता वर आज डॉक्टर जय राठोड यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली, आठ दिवसांपूर्वीच या शस्त्रक्रियेसाठी लागणारे रक्त स्वतः आकाश भारती याने रक्तदान करून जमा ठेवले होते, सविता सोबतच तिच्या सासऱ्यांचे सुद्धा उपचार काल झाले, दोघांनाही दवाखान्यात सुट्टी झाली, परंतु आज सविताचे सासरे यांची प्रकृती खालावली असल्यामुळे आम्ही सर्व संकल्प फाउंडेशन चे सदस्य त्यांच्या घरी पोहोचलो, तर वृद्ध कमलचे सासरे यांनी अखेरचा श्वास घेतला होता, मुखातून एकच उद्गार निघाले आपण हरलो, पण प्रयत्न हरलेले नाही, सामाजिक हितासाठी संघर्षाच्या ह्या वाटा, ह्या सर्व वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी संकल्पचा प्रत्येक कार्यकर्ता समर्पक भावनेने ह्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी कार्य करीत आहे त्यात प्रामुख्याने रवी ठाकूर,प्रशांत बोराडे, महादेव काचोरे, निलेश ठोंबरे, विनोद दोंदल यांनी व इतर सदस्यांनी सुद्धा आपली जबाबदारी पार पडली आहे ह्या कुटुंबाला आधार मिळावा म्हणूनआमचे प्रयत्न ह्या कुटुंबाचे पुनर्वसन होईस्तोवर सुरूच असणार आहे, कमलच्या त्या वृद्ध सासर्‍यांचा अंत्यविधी दुपारी बारा वाजता पार पडली, त्याकरिता संकल्प फाउंडेशन ने पुढाकार घेत शव पेटी, शव वाहिनी व इतर अंत्यविधी साहित्याची गोळाबेरीज करून अंत्य यात्रा पडली, ह्यात समाज बांधवांच्या व्यतिरिक्त संकल्प फाउंडेशन चे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार, रवी माहूरकर, रवी ठाकूर, मनोज तामगाडगे,अरुण सरागे,रामराव मोरे, राजेंद्र गावंडे, विनोद दोंदल, निलेश ठोंबरे,रवी कडू व इतर सदस्य उपस्थित होते

Copyright ©