Breaking News यवतमाळ

डी ए पीचा ट्रक कृषी अधिकारी यांनी पकडला

डी ए पीचा ट्रक कृषी अधिकारी यांनी पकडला

नागपूर येथून यवतमाळ

तालुक्यातील नाका पार्डि येथे खत विकत असताना कृषी अधिकारी यांनी धाड टाकून बोगस खत विक्री करणाऱ्या ट्रक क्र.जी जे २६, टी ६४८४ यास पकडण्यात आले या प्रकरणी चौकशी केली असता या ट्रक मधील २५० बॅग असल्याची माहिती पुढे आली या बॅग मधील खताची तपासणी केली असता केवळ माती दिसून आली हि बॅग नाका पार्डि येथील शेतकऱ्यांना प्रती बॅग,१४,७५ या दराने एकूण सात शेतकरयांना विकण्यात आल्या होत्या यांची विक्री सुरू असताना कृषी अधिकारी अजय उपलेंचवार,बेर्डे, मालोडे कृषी विकास अधिकारी व पोहेकर हे कारवाई करीत असून विक्री करीत असलेल्या चार झनाकडू ट्रक व बॅगा जप्त करण्यात आल्या हे जैविक खत म्हणून याची विक्री करण्यात येत होती तर या बॅग वर ज्या मात्रा आवश्यक आहे त्या मात्रा सुद्धा लिहिण्यात आल्या होत्या बोगस खताचे मोठे रॅकेट असल्याचा संशय कृषी अधिकारी उपलेंचेवार यांनी वेक्त केला असून शेतकऱ्यांनी खत किंवा बियाणे खरेदी करताना काळजी घेऊन खरेदी करावे,रस्त्यावरील बियाणे, खत खरेदी करू नये असेही आव्हान या वेळी करण्यात आले या वेळी गावातील सरपंच प्रेमकुमार धूर्वे,दिनकर भवरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Copyright ©