यवतमाळ सामाजिक

सातव्या दिवशी हि उपोषण कर्त्यान कडे प्रशासनाने फिरवली पाठ

सातव्या दिवशी हि उपोषण कर्त्यान कडे प्रशासनाने फिरवली पाठ

उपोषण कर्त्यांची प्रकृती चिंता जनक

पंचायत समिती यवतमाळ अंतर्गत

वाटखेड ग्रामपंचायत येथील अनेक प्रकरणात गैर प्रकार असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीता सोमवार १९ जून पासून वाटखेड ग्रामापचांयत समोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आज उपोषण कर्त्याना सात दिवस होऊन हि प्रशासनाने दखल घेतली नसल्याने उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली आहे या वरुन प्रशासन किती बेजबादार झाले हे दिसून येत आहे विशेष म्हणजे येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरू असताना एकही लोक प्रतिनिधी तर फिरकला नाहि मात्र प्रशासनाचा प्रतिनिधीही आला नसल्याने ग्रामस्थांन मध्ये व परिसरातील जनते मध्ये तीव्र नाराजी वेक्त करण्यात येत आहे

या प्रकरणी निवेदन जिल्हा अधिकारी यवतमाळ याना संगम बहुउद्देशीय संस्था यांनी दिले आहे

येथील ग्रामपंचायतीने खोटी ग्रामसभा घेऊन खोटे ठराव तयार केले यात तहसीलदार यौगेश देशमुख व तालुका प्रशासनाची दिशा भुल केल्या प्रकरनी, संगम बहूउद्देशिय गवळी समाज संस्थेच्या वतिने तक्रार दिली प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने गैर प्रकार करणाऱ्यास प्रशासन त्याना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामसभा न घेता ठराव घेणं, गावाच्या विकासा करीता आलेला निधी हडप करणे कोणत्याही प्रकारचां निधी दिसतच नाहि,येथील आज पर्यंत आलेल्या निधीची माहिती देण्यात यावी येथील निधीत झालेला गैर प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी इत्यादी प्रामुख्याने मागण्या असून त्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत उपोषण करण्यात येणार असल्याचे उपोषण कर्त्यानी सांगितले.आज सातवा दिवस असल्याने त्यांच्या प्रकृत्या बिघडल्या आहे यात

दिगांबर राघोजी अवथळे पाटील रत्नकला भिमराव डोलारकर, सोनाबाई तुकाराम शेरकर, रामजी तुकाराम टोम्पे, माजी सरपंच,लता गजानन मुरमुरे, विठ्ठल आत्राम

Copyright ©