यवतमाळ सामाजिक

धुळ पेरणी अल्प पावसामुळे आली धोक्यात     

पांढरकवडा प्रतिनिधी सागर मुडे

धुळ पेरणी अल्प पावसामुळे आली धोक्यात     

( मृग नक्षत्र गेला कोरडा )

खरीप हंगामाला जून महिन्या पासून सुरू होत असतांना 8 जून ला मृग नक्षत्र ला प्रारंभ झाला अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा मृग नक्षत्र मात्र कोरडा गेल्यामुळे बळीराजा अतिशय चिंताजनक परिस्थितीत सापडला आहे कारण धुळ पेरणी मृग नक्षत्र च्या शेवटच्या 2 दिवस अगोदर जवळपास 50 ते 60 टक्के शेतकऱ्याने हजारो हेकटर कपाशी व अन्य पिकांची लागवड करुन चातका प्रमाणे पावसाची वाट पाहात असतांना मृग नक्षत्र गेला कोरडा ओलताची व्यवस्था फारच मोजक्या शेतकऱ्यांन कडे आहे परंतु हजारो शेतकरी पाऊस पडत नसल्यामुळे आकाशा कडे वरून देवाला साकडे घातल आहे दरवर्षी प्रमाणे यंदाही कृपादृष्टी होईल व खरीप हंगामात चांगले उत्पन्न मिळेल या आशेने धुळ पेरणी करतात परंतु निसर्गाच्या लहरी पणामुळे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकलेले दिसत आहे बियाणे खत युरीया चे दर गगनाला भिडले असतांना निसर्ग सुध्दा साथ देत नाही मागील वर्षी कपाशी सोयाबीन चे उत्पादन कसे बसे शेवट पर्यंत बऱ्यापैकी झाले परंतु कपाशी व सोयाबीन ला योग्य भाव मिळाला नाही तरीही पुढील काळात शेतकरी संघर्ष मय पणे शेती करण्यास तयार झाला परंतु हवामान खाते व खाजगी हवामान तज्ञांकडून देण्यात येणार अंदाज वारंवार चुकत असल्याने कपाशी व तुरीची लागवड आली धोक्यात आली आहे परंतु हवामान खात्याचा अंदाज बदलत्या परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाजावर अवलंबून राहू नये प्रतक्ष पाऊस पडल्यावर पुढील पेरणीचे नियोजन करने गरजेचे दिसते

Copyright ©