यवतमाळ सामाजिक

डॉ.नागेश गवळी यांचं दमदार भाषण…अन् समता सैनिकांमध्ये उत्साह संचारला..! 

डॉ.नागेश गवळी यांचं दमदार भाषण…अन् समता सैनिकांमध्ये उत्साह संचारला..! 

दारव्हा येथे समता परिषदेची आढावा बैठक संपन्न

दारव्हा : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक तथा माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांचे मार्गदर्शनात देशभरात समता परिषदेची संघटनात्मक बांधणी सुरू आहे. विदर्भात तालुका स्तरावर आढावा बैठक घेण्यात येत आहे. समता परिषदेचे पदाधिकारी अहोरात्र झटत आहे. नुकतीच यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी प्रमुख आकर्षण ठरले ते प्रसिद्ध वक्ते डॉ.नागेश गवळी ! ओबीसी चळवळीची दिशा आणि विवध समस्या यावर त्यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. मंडल आयोग आणि ओबीसी जनगणना या संदर्भातील अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधले. विविध दाखले देत तपशीलवार माहिती सादर केली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आजवर ओबीसी समाजातील घटकांची व्यवस्थेने जाणीवपूर्वक केलेली गळचेपी या बद्दल विस्तृत मांडणी त्यांनी केली. मा.छगन भुजबळांनी ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी उभारलेला लढा डॉ. नागेश गवळी यांनी आपल्या भाषणातून श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभा केला. ही चळवळ पुढे घेवून जाण्यासाठी गाव खेड्यात संघटनात्मक बांधणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गवळी यांच्या भाषणातील प्रत्येक शब्द समता सैनिकांना ऊर्जा देणारा होता. अत्यंत पोटतिडकीने समता परिषदेची भूमिका मांडत होते. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी मधील सर्व समाज घटक एकत्रित येवून ऐतिसहिक चळवळ निर्माण करतील, असा आशावाद डॉ.गवळी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल जिल्हाध्यक्ष राजेंद्र घाटे व समता सैनिकांचं भरभरून कौतुक केले. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. समता सैनिक हरखून गेला. त्यांच्यात उत्साह संचारला. डॉ.गवळी यांची भाषण शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी चळवळीला दिशा देणारी ठरेल , असा विश्वास समता सैनिकांमध्ये निर्माण झाला. यावेळी समता परिषदेचे प्रदेश संघटक रवींद्र सोनवणे, अमरावती विभागीय अध्यक्ष प्रा.अरविंद गाभणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव खंदारे, अकोला जिल्हाध्यक्षा माया इरतकर, यवतमाळ पश्चिमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र घाटे, पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष विनोद इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनयना यवतकर, माळी महासंघ जिल्हाध्यक्ष अर्चना उडाखे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पाचपोर, अष्टविनायक अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष गणेश राऊत आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे औचित्य साधून नेर कृ.उ.बा.समितीचे सभापती मनोज नाल्हे, नेर बाजार समिती संचालक प्रदीप भगत, दारव्हा बाजार समितीचे संचालक प्रकाश दुर्गे या सहकार क्षेत्रातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीचा सन्मान करण्यात आला. तसेच समता परिषदेचे नवनियुक्त पदाधिकारी प्रवीण गोरे (महागाव प स), प्रदीप भगत नेर यांचे सह पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष संतोष उंबरकर, शहर अध्यक्ष अमोल दुर्गे, विजय उडाखे, नंदकिशोर जिरापुरे, दिगंबर लहाने, गोविंद नवरंगे, दामोदर येवले, प्रल्हाद नवसागरे, दीपक नवरंगे , शामराव शेळके व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©