यवतमाळ सामाजिक

वन विभागात तीन वनपाल चार वनरक्षक पदे रिक्त

दारव्हा तालुका प्रतिनिधी चेतन पवार

वन विभागात तीन वनपाल चार वनरक्षक पदे रिक्त

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय दारव्हा अंतर्गत येत असलेल्या संवेदनशील वनपरिक्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे कामकाज करताना या बाबीचा फटका सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्गाला बसल्या जात आहे

अलीकडच्या काळामध्ये वन्य प्राण्यांचे हल्ले यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून ग्रामीण भागात राहणारी शेतमजूर आणि शेतकरी यांच्यासाठी ही चिंतेची बाब झालेली आहे सदर कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची कमी असल्यामुळे वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या शेत पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास पर्यायाने विलंब होत आहे दारव्हा वनाचे क्षेत्र अतिशय मोठे असून संवेदनशील सुद्धा आहे एकूण तब्बल 15000 संवेदनशील वनपरिक्षेत्र आहे वन विभागाचा संबंध सरळ शेतकरी वर्गांशी येत असून झाडे तोडण्यासाठी मिळणारी परवानगी वन्य प्राण्याकडून झालेल्या नुकसानीची पाहणी आणि पंचनामा वनांमधील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाणे शेतकऱ्यांच्या तक्रारीवर त्याची प्रत्यक्ष पाहणी करणे त्याचप्रमाणे दारव्हा वनपरिक्षेत्रामध्ये तीन निसर्ग वन पर्यटन येत असून या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते रोपवाटिका तयार करताना त्या ठिकाणी मजुरांवर देखरेख करणे आणि मजुरांकडून काम करून घेणे यासाठी सुद्धा मनुष्यबळाची आवश्यकता असते अनेक शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या आणि वन विभागात काम करणाऱ्या मजुरां च्या समस्या असून या ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने येणाऱ्या काळामध्ये कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कर्मचारी दिल्यास या ठिकाणी असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा मिळेल

पालकमंत्र्याच्या गृह मतदारसंघांमध्येच कर्मचारी कमी असल्याने परत परिसरातील जनतेमध्ये चर्चेचा विषय बनला आहे दस्तर खुद्द पालकमंत्री स्वतः लक्ष देऊन या गंभीर विषयाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन कर्मचारी दिल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही

Copyright ©