Breaking News यवतमाळ

गावाचा रक्षक बनला भक्षक

गावाचा रक्षक बनला भक्षक

वाई रूई येथील पोलीस पाटलाने महिलेस विळा मारून केले जखमी

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत वाई येथील अनुसया मारोती पेटकर वय 70 रा. वाई यांच्या शेतावरील गैर अर्जदार विशाल रामविलास शिंदे वय 40 वाई,यांनी आपली म्हैस अनुसया यांचे घरी सोडली ती अनुसयाबाई यांच्या घरी लावलेले झाडे, कडाळू खाईल म्हणून तिला हकालली त्या कारणावरून येथील पोलीस पाटील विशाल रामविलास शिंदे यांनी त्या महिलेस जबर मारहाण केली व मांडीवर विळ्याचे घाव मारले यात अनुसायाबाई खाली कोसळली हि बाब अनुसया बाई याच्या परिवाराच्या लक्षात येताच मुलगा व पती यांनी येऊन तिला वाचवले या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली यात 324,504,506 नुसार गुन्हा दाखल केला असून अनुसया बाई यांचेवर उपचार सुरू आहे पोलीस पाटील असल्याने याची गावात एक प्रकारची हुकूम शाही सुरू आहे आता ग्रामस्थानी अपेक्षा करावं तर कुणा कडून याची गांभीर्य ओळखून पोलीस पाटील यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे

Copyright ©