Breaking News यवतमाळ

जोडमोहा येथील वार्ड क्रं ३ मध्ये २-३ महिन्या पूर्वी बांधलेला सिमेंट रपटा निखळून गेला

जोडमोहा येथील वार्ड क्रं ३ मध्ये २-३ महिन्या पूर्वी बांधलेला सिमेंट रपटा निखळून गेला

कळंब पंचायत समिती अंतर्गत शासनाच्या विविध राज्य कल्याणकारी योजनांअंतर्गत ग्रामविकासाची कामे सुरु आहेत. त्यात गावातील अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ते, सिंचन विहीरी, नाल्या, शोचालय, घरकुल, दलीत वस्ती विकास कामे आदिंचा समावेश येतो. मात्र ही कामे करताना संबंधीत सरपंच, सचिव खासगी ठेकेदारांना हाताशी धरुन आपले खिसे कसे गरम करता येईल याकडेच जास्त लक्ष देत असल्याचे या ग्रामपंचायत च्या

कारभारावरुन राम भरोसे काम दिसून येते.

कळंब तालुक्यातील जोडमोहा येथे वार्ड क्र.३ मध्ये सिमेंट काँक्रीट नाली वरील रपटा काम गेल्या दोन तीन महिने आधी केले असून मात्र या कामाकडे वार्ड सदस्य यांचे लक्ष नसल्याने सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. थातुर मातुर काम करून लाखो रूपये बिल काडणाऱ्या कंत्रादाराला काळ्या यादीत टाका व संबधित अधिकाऱ्याला बडतर्फ करा असा जनतेतून आवज उठत आहे. विशेष म्हणजे नुकतेच पावसाळा सुरू झाला असून या रपट्या मुळे ग्रामस्थाना मोठ्या त्रास सहन करावा लागत आहे

कळंब गटविकास अधिकारी मानकर वरिष्ठांनी सदर नाली रपटया च्या कामाकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे सरपंच व सचिव खाजगी ठेकेदाराला हाताशी धरून निकृष्ट कामे चालविल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण होत असल्याचे दिसून येते आहे.

त्यामुळे या कामात होत असलेल्या गोंधळाची लवकरात लवकर चौकशी होवून गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच उत्कृष्ट दर्जाचे व गुणवत्ता युक्त काम करण्याची मागणी होत आहे.

Copyright ©