यवतमाळ सामाजिक

विनोद दोंदल पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित

विनोद दोंदल पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित

यवतमाळ – उज्वल नगर मध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते विनोद दोंदल यांचा निसर्गप्रति करत असलेल्या सामाजिक कार्याचा पर्यावरण मित्र म्हणून सत्कार करण्यात आला,

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे वसंत वसंत लॉन येथे नुकत्याच संपन्न झालेल्या पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र नियंत्रण मंडळ नागपूर यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय पर्यावरण संम्मेलन 2023 पार पाडण्यात आला, या कार्यक्रमात सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार व सन्मान करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे डी. के. आरीकर यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचालक तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बुटीबोरी येथील अधिकारी, संत तुकाराम महाराज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूरचे अध्यक्ष गुनेश्वर आरीकर, संत गजानन महाराज सहकारी पतसंस्था नागपूरचे अध्यक्ष स्वप्निल मेंढे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येरेकर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते,

विनोद दोंदल यांनी सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य जसे वृक्षारोपण करणे, मुलांना आपल्या जीवनातील वृक्षाचे महत्त्व पटवून देणे, ओसाड पडलेल्या जगलात फेकण्यासाठी सीडबॉल तयार करणे व सीडबॉल तयार करण्याची कार्यशाळा घेणे, गरजवंत, बिमार व्यक्तीनं मदत करणे, प्लास्टिक निर्मूलनात सहकार्य करणे, उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी पाणी पुरवठे तय्यार करणे, असेच एक ना अनेक सामाजिक कार्यात उपस्थित राहून स्वहस्ते उल्लेखनीय योगदान दिल्या बद्दल विनोद दोंदल यांचे आयोजन समिती पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य यांच्या कडून मानचिन्ह (ट्रॉफी) व सन्मानपत्र देऊन पर्यावरण मित्र म्हणून सत्कार करण्यात आले,

हया कार्यक्रमात सर्व महाराष्ट्रातील पर्यावरणावर व सामाजिक क्षेत्रात चागले कार्य करणारे समाज सेवक उपस्थित होते, या प्रसंगी समितीच्या विदर्भ अध्यक्षा श्रीमती सुरेखा रडके, बाबासाहेब भोयर वर्धा जिल्ह्यातील अध्यक्ष विनोद सातपुते, सौ. विजया रोकडे, गजानन जिकर, सौ.शीला सोनारे मिळालेला हा पुरस्कार कोण्या एकट्याचा नसून यवतमाळ जिल्ह्यात खांद्याला खांदा लावून सोबत कार्य करणाऱ्या टीम चा आहे, जिल्हा सचिव प्रकाश खुडसंगे, जिल्हा संघटक मनोहर बोभाटे, आशीष भोयर, शैलेश आडे, सौ.दीक्षा नगराळे, निलेश वाभीटकर, आकाश राऊत, चेतन दुर्गे, पवन तेलंगे, प्रवीण नान्हे, अजय मांडवकर, राजेश्वर डभारे, राजेंद्र ठुने, रोशन बावणे, गौतम तांगडे, युसुफ अली सय्यद, शंकर जोगी, प्रदीप कोरडे इत्यादी मान्यवरांचा आहे

Copyright ©