यवतमाळ सामाजिक

शिवणी येथील गौरक्षकांवरील हल्लेखोरांना तात्काळ अटक करा

शिवणी येथील गौरक्षकांवरील हल्लेखोरांना तात्काळ अटक करा

बजरंग दलाची मागणी; तहसिलदारांना निवेदन सादर

दिग्रस (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील शिवणी, ता. इस्लापूर या ठिकाणी गोरक्षकांवर काही हल्लेखोरांनी हल्ला केला. यामध्ये एका गौरक्षकाचा मृत्यू झाला. तर इतर चार गोरक्षक गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणातील हल्लेखोर दोषींना तात्काळ अटक करण्यात यावे, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. सोबतच मृत पावलेल्या गौरक्षकाच्या परिवारास शासनातर्फे १० लाख रुपये मदत करण्यात यावी, अशी मागणी बजरंग दल, शाखा-दिग्रसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत दिग्रस बजरंग दलाच्या वतीने दिग्रस तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

 

तसेच यवतमाळ जिल्ह्यातून तेलंगणा येथे दररोज हजारोच्या संख्येने गोवंशाची तस्करी ही प्रशासनाच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे कत्तलीकरिता केली जात आहे. शिवणी प्रकरणातील गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे. तसेच तेलंगणा राज्याला लागून असलेल्या चेक पोस्ट वरून गोवंशाची तस्करी होऊ नये, याकरिता सदर चेक पोस्टवर विशेष पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी मनोज सरवैय्या, स्वप्नील जाधव, मनोज ढाले, सुशील जोशी, रमेश टाले, सुशील शिंदे, विक्रम जाधव, कुणाल जती, विवेक डोंगरे, राहुल अंभोरे, सौरभ गुप्ता, धनंजय देशपांडे, विजय पुणेकर, संकेत सरोदे, ऋषिकेश महल्ले, कुणाल खानजोडे, कृष्णा शिंदे, सौरभ टाक यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©