यवतमाळ सामाजिक

माध्यमिक कन्या शाळा उर्दु माध्यमचे आता जाफर नगर येथे होणार स्थांनातरण

माध्यमिक कन्या शाळा उर्दु माध्यमचे आता जाफर नगर येथे होणार स्थांनातरण

मुस्लिम विद्यार्थींनी मध्ये उत्साहाचे वातावरण

यवतमाळ ः शिक्षण विभाग प्राथामिक जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत जिल्हा परिषद माजी शासकीय (ब्रिटीश कालीन) माध्यमिक कन्या शाळा (उर्दु माध्यम) तहसील चौक यवतमाळ ही शाळा ब्रिटीश कालीन माजी शासकीय शाळा आहे. सदर शाळेच्या परिसरामध्ये या भागात खुप रहदारी राहत असल्यामुळे ही शाळा जाफर नगर परिसरात स्थानांतरीत करावी अशी मागणी माजी नगर सेवीका ताहेराबी अब्दुल हबीब जुल्फीकार अहेमद उर्फ बबली भाई व पालकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे मागील वर्षापासून अवरितपणे रेटून धरली होती. जाफर नगर भागातून या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थींनी शिक्षणासाठी येत असल्यामुळे माजी नगर सेवक व पालकांच्या विनंतीला मान देऊन जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक कन्या शाळा (उर्दु माध्यम) ही शाळा जाफर नगर येथे स्थानांतरित करण्याचे आदेश आज दि. २१ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी दिल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करुन निर्णयाचे स्वागत केले आहे.

या प्रसंगी माजी नगर सेवीका ताहेराबी अब्दुल हबीब जुल्फीकार अहेमद उर्फ बबली भाई, साजिद पेंटर रिजवी, सलावत खान, मो. ईरशाद अली (बंटी), जियाउल करिम, काशिफ खान, हमीदउल्ला खान, मो. तारिक मो. आसिफ, समीर राजा, राफे मिर्झा, शामीन शाह, शोएब शाह, सोहेल शेख, वसिम शाह, साहिल शेख आदि उपस्थित होते.

Copyright ©