यवतमाळ राजकीय

आजपासून नेर, दिग्रस, दारव्हा तालुक्यातील गुणवंतांचे कौतुक

आजपासून नेर, दिग्रस, दारव्हा तालुक्यातील गुणवंतांचे कौतुक

पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत होणार सन्मान

यवतमाळ – इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेत ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या दिग्रस मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उद्या दि. २२, २३ व २४ जून रोजी अनुक्रमे नेर, दिग्रस व दारव्हा येथे आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रेरणेतून शिवसेना, युवासेना व विद्यार्थीसेना व मलिा आघाडीने या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दहावी, बारावीसह नीट व जेईई परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना राज्याचे अनन् व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. गुरूवार, २२ जून रोजी सकाळी ११ वाजता नेर येथील निर्मल बन्सी लॉन, दिग्रस येथे शुक्रवार, २३ जूनला सकाळी ११ वाजता राजेश्वर मंगल कार्यालयात आणि दारव्हा येथे शनिवारी, २४ जून रोजी शिव लॉनमध्ये सकाळी ११ वाजता हा कौतुक साहेळा होणार आहे. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Copyright ©