यवतमाळ सामाजिक

न्याय न मिळत असल्याने अखेर वाटखेड ग्रामपंचायत समोर उपोषण

न्याय न मिळत असल्याने अखेर वाटखेड ग्रामपंचायत समोर उपोषण

पंचायत समिती यवतमाळ अंतर्गत

वाटखेड ग्रामपंचायत येथील अनेक प्रकरणात गैर प्रकार असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीता सोमवार १९ जून पासून वाटखेड ग्रामापचांयत समोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून याचे निवेदन जिल्हा अधिकारी यवतमाळ याना संगम बहुउद्देशीय संस्था यांनी दिले आहे

येथील ग्रामपंचायतने खोटी ग्रामसभा घेऊन खोटे ठराव तयार केले यात तहसीलदार यौगेश देशमुख व तालुका प्रशासनाची दिशा भुल केल्या प्रकरनी, संगम बहूउद्देश्यिय गवळी समाज संस्थेच्या वतिने तक्रार दिली असता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्या करीता या ऊपोषणाचे आयोजन करण्यात आले असल्याचे दींगाबर अवथळे यांनी मध्यामाशी बोलताना सांगितले,पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या कडे अनेक वेळा न्यायाची मागणी केली मात्र न्याय तर दूरच साधे उत्तर द्यायला हि प्रशासन तयार नसल्याने सर्व सामान्य जनतेनी न्याय मागावं तर कुणा कडे स्वाततंत्र काळात गुलामीची वागणूक जनतेला मिळत आहे. याची त्वरित दखल घ्या अन्येथा इथेच आत्मदहन करू असा इशारा अन्यायग्रस्त उपोषण कर्त्याने दिला आहे.ग्रामपंचायत वाटखेड येथे शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी येतो परंतु गावाच्या विकासा करीता निधी दिसतच नाहि,येथील आज पर्यंत आलेल्या निधीची माहिती देण्यात यावी येथील निधीत झालेला गैर प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी इत्यादी प्रामुख्याने मागण्या असून त्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत उपोषण करण्यात येणार असल्याचे उपोषण कर्त्यानी सांगितले.

Copyright ©