यवतमाळ शैक्षणिक

मेवार कप राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये कराटे स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचे सुयश

मेवार कप राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये कराटे स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचे सुयश

_पहिली मेवार राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कराटे स्पोर्ट्स अकॅडमी च्या खेळाडूंचे उत्कृष्ठ प्रदर्शन राहिले. दिवसेंदिवस कराटे खेळामध्ये अधिकाधिक प्रगती होत आहे. पहिली मेवार राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कराटे स्पोर्ट्स अकॅडमी च्या खेळाडूंनी उत्कृष्ठ प्रदर्शन दाखवून यवतमाळची मान उंचावर नेली, तसेच आपल्या प्रशिक्षकासोबत आई वडिलांचा स्वाभिमान वाढविला.

ही स्पर्धा वर्साटाईल शोतोकन कराटे फाउंडेशन इंडीया व के वी एस अकॅडमी उदयपूर यांच्या विद्यमाने उदयपूर, राजस्थान येथे घेण्यात आली, या स्पर्धेमधे यवतमाळच्या खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ठ प्रदर्शन दाखवून यश संपादन केले.

कराटे मधील काता या प्रकरामध्ये १८ वर्षे वयोगटात ज्ञानेश्वर राठोड (गोल्ड मेडल), ओम डेहनकर (सिल्वर मेडल) १३ वर्षे वयोगटात प्रेम नेवारे (गोल्ड मेडल), १० वर्षे वयोगटात प्रणिल ठाकरे (सिल्वर मेडल), अनिरुद्ध जाधव (ब्रांझ मेडल), ८ वर्षे वयोगटात हर्षवर्धन पालकर (सिल्वर मेडल) आदित्य जाधव (सिल्वर मेडल) तसेच कुमित्ते या प्रकारात १८ वर्षे वयोगटात ज्ञानेश्वर राठोड (गोल्ड मेडल), ओम डेहनकर (ब्रांझ मेडल) १३ वर्षे वयोगटात प्रेम नेवारे (गोल्ड मेडल), १० वर्षे वयोगटात प्रणिल ठाकरे (ब्रांझ मेडल), अनिरुद्ध जाधव (ब्रांझ मेडल), ८ वर्षे वयोगटात हर्षवर्धन पालकर (ब्रांझ मेडल) आदित्य जाधव (ब्रांझ मेडल), ब्लॅक बेल्ट चँपियन ऑफ चँपियन मधे ज्ञानेश्वर राठोड यांनी द्वितीय क्रमांक (सिल्वर मेडल) पटकावला..

या खेळाडूंचा सत्कार शिहान महावीर चव्हाण (अध्यक्ष वर्साटाईल शोतोकान कराटे फाउंडेशन इंडिया) व सेन्साई सुजित पत्रे (अध्यक्ष कराटे स्पोर्ट्स अकॅडमी यवतमाळ) ह्यांच्या हस्ते करण्यात आला..

मा. आमदार बच्चुभाऊ कडू माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य., नितीन भाऊ मिर्झापुरे नगरसेवक तथा प्रहार जिल्हा प्रमुख यवतमाळ यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले..

महाराष्ट्र संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून कु. आरती गोंडोले व महिला प्रशिक्षक म्हणून एन आय एस प्रशिक्षक कु स्नेहल बोरकर होत्या.

सर्व खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय आपले मार्गदर्शक शिहान महावीर चव्हाण, प्रशिक्षक सेन्साई सुजित पत्रे, स्नेहल बोरकर, शुभम राठोड, ज्ञानेश्वर राठोड व आई वडील ह्याना दिले…

Copyright ©