यवतमाळ सामाजिक

स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा मॉंसाहेबांच्या प्रतिज्ञेतूनच निर्माण झाली – प्रा.डॉ. अनंतकुमार सूर्यकार

स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा मॉंसाहेबांच्या प्रतिज्ञेतूनच निर्माण झाली – प्रा.डॉ. अनंतकुमार सूर्यकार

मानवतावादी विचारधारेचा प्रचार व प्रसार करणारे गुरुदेव सेवा मंडळ, मंगरूळ ( तरोडा ), ता. जि. यवतमाळ ,नोंदणी क्रमांक एफ- २०९३८ व ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रमाता, राजमाता, आई जिजाऊ यांचा३५० वा स्मृतिदिन उत्साहाने साजरा करण्यात आला.

सर्व प्रथम सायंकाळच्या दैनंदिन सामुदायिक प्रार्थनेचा परिपाठ घेण्यात आला. आई जिजाऊ व वंदनीय राष्ट्रसंत यांच्या प्रतिमांचे पूजन व मालार्पण उपस्थित उपासकांच्या हस्ते करण्यात आले.

मॉं जिजाऊ यांच्या समग्र चरित्रावर रामेश्वर गावंडे व अरूण सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले.

मॉं जिजाऊंकडे या विश्वातील प्रेरक शक्ती म्हणून बघितल्या जाते. बा शिवरायांला जन्म देऊन इतर महिलाप्रमाणे मुक्त होणे एवढीच जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही तर सुपुत्राला नैतिकतेची, धर्माची व राजकारणाची शिकवण दिली. जाधव आणि भोसले घराण्यामध्ये न भूतो न भविष्यती वैमनस्य निर्माण झाले होते तरीही माहेरच्या नात्यापेक्षा पती व मुलांची साथ कधी सोडली नाही. स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न मॉंसाहेबांनीच पाहिले होते ते स्वप्न वीर पुत्र शिवरायांकडून पूर्ण केले. राज्याभिषेक व छत्रपती पद मिळाल्यानंतर मॉंसाहेबांनी काही दिवसांतच अखेरचा श्वास घेतला. असे डॉ अनंतकुमार सूर्यकार , संघटक, यवतमाळ तालुका गुरुदेव सेवा मंडळ यांनी प्रसंगानुरूप केले.

विठ्ठल कोडापे, ताराचंद चव्हाण, संजय कांबळे, रामेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर कोडापे, अरूण सोनटक्के, महादेव तुमडाम, सुनील गिरपुंजे, गणेश सोनोने, शंकर पोहोरकर, दत्ता इंगळे, नारायण सूर्यकार, पंडित काळे, मारोती पवूळ, दीपक हारे, गणेश जोगे, वसंत वनवे, गोपाल उईके, विजय ढोके, नंदाताई सोनटक्के, सुशिला गोते, बहिणाबाई कोडापे, सुमित्रा मोडले, राधा मोडले, दिलीप मोडले, गजानन मोडले, अभय सोनटक्के, प्रिया ढोके, बेबी ढोके, मंदा काळे,अक्षरा मोडले, स्वराली काळे, आराध्या,राणी, अथर्व भागडे, मयूर ढोके, अद्विक, शुभ्रा, ध्यांशी, आरुषी डोंगरवार,मिनल राठोड, नंदनी, आराध्या जोगदंडे, मयूर ढोके, साहील खेरे, देवा पोहोरकर, ओम गावंडे, देवांश गावंडे, पृथ्वी सूर्यवंशी,मानव हारे, गौरव नेमाडे, सफल राठोड, प्रयास राठोड, विश्वास पाटील, नैतिक सहारे, प्रतीक इंगळे, दिनेश राठोड,अद्विक ऊर्फ गुड्डू, अर्जुन राठोड,साई इंगळे,करण राठोड व ग्रामस्थांची कार्यस्थळी उपस्थिती होती.ज्ञानेश्वर कोडापे यांनी सूत्रसंचालन तर महादेव तुमडाम यांनी सर्वांचे आभार मानले.रामेश्वर गावंडे यांनी मॉं जिजाऊ वर सुंदर गीत सादर करून राष्ट्रवंदनेनी स्मृतिदिनाची सांगता झाली.

Copyright ©