यवतमाळ राजकीय

आम् आदमी पार्टी च्या संवाद सभेत अनेकांचा पाठिंबा

आम् आदमी पार्टी च्या संवाद सभेत अनेकांचा पाठिंबा

यवतमाळ शहरात सुद्धा जनतेचा आम् आदमी पार्टी ला पाठिंबा वाढत असल्याने नुकतीच यवतमाळ शहरात नुकतीच संवाद सभा घेण्यात आली यात

यवतमाळ तालुका समिती तर्फे विदर्भ हाऊसिंग सोसायटी येथे दि 15 जून 2023 रोजी रात्री 08 : 00 वाजता यवतमाळ तालुका अध्यक्ष मोबीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य संवाद सभा घेण्यात आली. या सभेचे प्रमुख मार्गदर्शक यवतमाळ तालुका सचिव कविश्वर पेंदोर यांनी भूषविले व आम आदमी पार्टी ने काढलेल्या स्वराज्य यात्रेचा उद्देश पटवून दिला. तसेच य. ता. शिक्षक आघाडी अध्यक्ष सलीम शेख यांनी सुद्धा उपस्थित असलेल्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन दिल्ली मधील आप सरकारने शिक्षण मोफत देऊन देशाचा पाया मजबूत केला या मुद्द्यावर प्रकाश टाकला. OBC आघाडी अध्यक्ष सौ नंदा अंबाळकर यांनी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या मुद्द्यावर उपस्थित असलेल्या लोकांसोबत चर्चा केली. यवतमाळ तालुका उपाध्यक्ष प्रियंका शेळके, यवतमाळ तालुका उपाध्यक्ष ओंकार चव्हाण,शहर संघटक गोपाल गावंडे, जेष्ठ कार्यकर्ते प्रकाशजी डब्बावार व युवा अध्यक्ष आकाश चमेडिया यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी युवा विधानसभा सभा अध्यक्ष शुभम चांदेकर, य. शहर अनुसूचित जमाती चे अध्यक्ष शत्रुघनजी आडे हे उपस्थित होते. या सभेला लोकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.

Copyright ©