Breaking News यवतमाळ

चोवीस तासात पोलिसांनी खुनातील आरोपीस केली अटक

तालुका प्रतिनिधी/दारव्हा चेतन पवार

चोवीस तासात पोलिसांनी खुनातील आरोपीस केली अटक

लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत पाथ्रड ( देवी ) येथील राहत्या घरात खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत खुनातील आरोपीस अटक करण्यात आल्याने पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे
सवि.असे की पाथ्रड ( देवी ) येथील हरिदास गायकवाड यास त्याच्या राहत्या घरीच त्याचा खून करण्यात आल्याची तक्रार मृतक याच्या पत्नीने लाडखेड पो.स्टे. ला देताच
सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे सूचना देत उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिलखेकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे अनधिस्त पथक लाडखेड यांना दिल्या, यावरून सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला असता पाथ्रड ( देवी ) येथील नागरिकांना विचार पुस करीत यां घटनेबाबत चौकशी केली असता अनेकांचे जबाब नोंदविण्यात आले लगेचच्या काळात मृतक यांचे दैनंदिनी घटनाक्रम याबाबत बारकाईने तपास सुरू केला असता मृतक हरिदास हा अंदाजे तीन ते चार दिवसापासून अनोळखी इसमा सोबत त्यांचे राहते घरी वावरत असल्याचे आढळून आले या माहितीवरून पोलीस पथकांनी आपली तपास चक्रे अनोळखी इसमाविरुद्ध सुरू केली असता मृतक त्यांचे संबंध काय याकडे बारकाईने चौकशी सुरू करण्यात आली यात काही गोपनीय काही गोपनीय माहितीवरून या प्रकरणाचा कसोशीने शोध घेतला असता सदर अनोळखी इसम गौरव अशोक घुगरे वय अंदाजे 22 वर्ष राहणार माळ म्हासोला ता. जिल्हा यवतमाळ हा असल्याचे निष्पन्न झाले असता यवतमाळ येथून या इसमास ताब्यात घेऊन सदर घटने संदर्भात विचारपूस केली असता प्रथमदर्शी तो असमाधानकारक उत्तर देत होता त्यास पोलीस कौशल्याने विचारणा केली असता त्यांनी त्याच्या मित्र नामे हरिदास गायकवाड यास त्याचे राहते घरी जीवनाशी ठार मारण्याची कबुली दिली यावरून त्यास सदर गुन्ह्यात ताब्यात घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने इतर पुराव्याची जुळवा जुळव करण्यासाठी आरोपीची विचारपूस सुरू केली आहे ,पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकार आदित्य मिलखे कर हे करीत असून सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिलखेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप परदेशी ,गणेश वनारे बबलू चव्हाण, किशोर झंडेकर मिथुन जाधव अमित झेंडेकर चालक अमित कुंभेकर कुंमरे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल निराळे ठाणेदार लाडखेड, पोलीस उपनिरीक्षक टेंबरे प्रेम राठोड उमेश शर्मा सावदे विठ्ठल कोकणकर विलास राठोड जयंता शेंडे पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार पोलीस उपनिरीक्षक दीपक राणे चालक कृष्णा साखरकर अविनाश गोदमले आशिष मैंद यांची या प्रकरणी नेमणूक करण्यात आली होती.

Copyright ©