Breaking News यवतमाळ

खुनाचे सत्र : राहत्या घरातच इसमाचा खात्मा

तालुका प्रतिनिधी/दारव्हा

खुनाचे सत्र : राहत्या घरातच इसमाचा खात्मा

पाथ्रड (देवी) येथील घटना : अज्ञात इसमाने हत्या केल्याचा संशय

तालुक्यातील पाथ्रड (देवी) देवी येथे काल दि.१५ जुन रोजी सायंकाळी ४. ३० वाजताच्या दरम्यान घरात मृत अवस्थेत प्रेत आधळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. सदर मृतक व्यक्तीचा खून झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.लाडखेड पोलिस स्टेशन च्या हद्दीत ही घटना घडली असून,या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील लाडखेड पोलिस स्टेशन च्या हद्दीत पाथ्रड (देवी) येथे काल दिनांक १५ जुन रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान एका घरात फिर्यादी चा पती नामे हरिदास माणिकराव गायकवाड वय ४२ वर्ष हा फिर्यादी नामे दुर्गाबाई हरिदास गायकवाड यांचे सोबत घटनेच्या अगोदरच्या दिवसी फोनवर बोलला होता.त्यांनंतर संपर्क केला असता त्यांचेशी संपर्क झाला नाही.मृतक त्यांचे राहत्या घरात मृत अवस्थेत मिळून आल्याने त्यांच्या प्रेताची दुर्गंधी सुटल्याचे त्यांचे नातेवाईक सुरेश गायकवाड यांनी कळविल्याने फिर्यादी ने घरी येऊन पाहिले असता, सदर मृतक हे घरात पडून दिसले.तसेच मृतक सुजलेले असल्याने चेहरा ओळखू येत नसल्याचे दिसले.त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी मृतक यास जिवानिशी ठार मारले असावे.अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फिर्यादी महिला पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध ३०६/२३भा. द.वी. कलम ३०२ चा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास लाडखेड पोलिस स्टेशन करीत आहे.

Copyright ©