यवतमाळ शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य, चिकाटी ठेवा तहसीलदार मीरा पागोरे

विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य, चिकाटी ठेवा तहसीलदार मीरा पागोरे

. खूप अभ्यास करा. मोठे व्हा व विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना सातत्य, जिद्द व चिकाटी ठेवून अभ्यास करावा. व आपण कोणतेही काम करीत असतांना एखाद्या वेळेस अपयश येते .अपयश यशाची पहिली पायरी आहे या पायरीला खुचून न जाता आपण प्रयत्न करत पुढे जा जोपर्यंत आपणास यश मिळत नाही तोपर्यंत आपण कधीच त्याग करायचा नाही. असे मत बाभळगाव येथील तहसीलदार मीरा पागोरे यांनी व्यक्त केले.

कोपरा जानकर येथील संत गजानन महाराज संस्थानचे वतीने दिनांक 15 जून रोजी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात तहसीलदार मीरा पागोरे ह्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मीरा पागोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार रवींद्र  जेधे, पद्माकर ठाकरे, उपसरपंच प्रवीण वाईकर, प्रतिष्ठित नागरिक नंदू अंबलकर, केशव वाईकर,  तेजराज मंगळे, संजय तिरपुडे  हे मंचकवार उपस्थित होते.

पागोरे ह्या पुढे बोलताना म्हणाल्या की, शिक्षणाचा कधी त्याग करू नये त्याग करायचा असेल तर आळसचा त्याग करा त्याग करणे माणसांचा हा खरा धर्म आहे आळसाचा त्याग केल्यास सुवर्णक्षण जीवनात वाट पाहत असतो. संधी ही प्रत्येकाच्या जीवनात येते त्या संधीचे सोने करण्याचे आपल्या हातात असून विद्यार्थ्यांनी येथे न थांबता ध्येय निश्चित करून तुम्हाला अगोदर काय साध्य करायचे आहे हे त्या ध्येयाचा दिशेने वाटचाल करा ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका आपल्या जीवनाला ज्यांनी दिशा दिली अशा गुरू जणांचा आई-वडिलांचा आदर करावा असे मत पागोरे यांनी व्यक्त केले.

यावेळी गावातील दहावी व बारावी मध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सूत्रसंचालन कुमोदनी माहुरे तर प्रस्ताविक गौरव सारडे यांनी केले व आभार कल्पक वाईकर यांनी मानले. यावेळी संस्थेचे विश्र्वसंत मंडळ विद्यार्थी व पालकवर्ग गावकरी उपस्थित होते.

Copyright ©