महाराष्ट्र यवतमाळ

कोर्ट फी टिकीटचा काळाबाजार जोरात सुरू

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

कोर्ट फी टिकीटचा काळाबाजार जोरात सुरू

देवळी शहरात हल्ली कोर्ट फी टिकीट ५ व १० रु यांचा काळा बजार सध्या जोरात सुरू आहे.त्यामुळे कोर्ट फी टिकीट घेणाऱ्यांची सर्रास लूट होत आहे.मात्र कोषागार अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही.

सध्या शासकीय अर्जावर लावण्यासाठी तसेच माहिती अधिकार अर्जावर लावण्यासाठी तसेच अनेक शासकीय कामाकरिता या कोर्ट फी टिकीटचा मोठ्या प्रमाणात गरज भासते परंतु हे कोर्ट फी टिकीट शासकीय कामासाठी लागणारे अर्ज विकतात ते या कोर्ट फी टिकीटची किंमत दुहेरी तिहेरी पटीने जास्त आकारून गरजू लोकांना देतात कुणी जर टिकीटाच्या किंमत प्रमाणे पैसे सांगितले तर घ्यायची असेल तर घ्या नाहीतर चालते व्हा असे सांगून गरजूंना सर्रास लुटत आहे परंतु कोषागार अधिकाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेले दिसत आहे कोर्ट फी करणाऱ्या टीकीटाचा काळाबाजार करणाऱ्या वर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी देवळीकर जनता करीत आहे.

Copyright ©